आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Janardan Dwivedi's On Ending Caste based Reservation And Going For Quota On Economic Criteria

आर्थिक आधारावर आरक्षणाचा विचार नाही, सरकारने राज्यसभेत केले स्पष्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी जातींवर आधारीत आरक्षणा ऐवजी आर्थिक आधारावर आरक्षण दिले पाहिजे, असे वक्तव्य मंगळवारी केले होते. त्यावरुन आज (बुधवार)राज्यसभेत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर सरकारचा तसा कोणताही विचार नसल्याचे राज्यसभेत स्पष्ट करण्यात आले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी मंगळवारी जातींवर आधारीत आरक्षणाला विरोध केला होता. आज राज्यसभेत त्यावर स्पष्टीकरण दे्ण्यात आल्यानंतरही द्विवेदी त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी जातींवर आधारीत आरक्षण दिले जाते मात्र, त्यातील एक वर्ग आर्थिकदृष्टा सक्षम झाला असून आता ख-या गरजूंरपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचत नाही. त्यामुळे यापुढे जातींवर आधारीत राखीव जागांऐवजी आर्थिक दुर्बलतेच्या आधारावर आरक्षणाची तरतूद केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. हे माझे वैयक्तिक मत असून ते पक्षासमोर ठेवणार असल्याचेही ते म्हणाले.
द्विवेदी यांच्या मतांशी त्यांच्याच पक्षातील अनेक नेते सहमत नाहीत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित जोगी यांनी, द्विवेदी यांनी व्यक्त केलेले मत हे त्यांचे वैयक्तिक असल्याचे सांगत, पक्षाचा तसा कोणताही विचार नसल्याचे म्हटले आहे. जातींवर आधारीर आरक्षणाची आजही नितांत गरज असल्याचे जोगी म्हणाले.

पुढील स्लाइडमध्ये, द्विवेदी राहुल गांधींनाही करणार सुचना