आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Japan Plans Space Elevator International News In Marathi

VIDEO: 2050 पर्यंत अंतराळात जाण्यासाठी राहिल लिफ्ट, जपानी कंपनीचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- स्पेस एलिव्हेटरचा ग्राफिक्स व्ह्यू.)
जपानची एक कंपनी एक अशी लिफ्ट तयार करणार आहे, की त्यातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक किंवा पृथ्वीच्या वातावरणाबाहेर अंतराळात सहज जाता येणार आहे. 2050 पर्यंत ही लिफ्ट तयार केली जाणार असून सुमारे 96,000 किलोमीटर उंच राहणार आहे.
जपानची सर्वांत मोठी बांधकाम कंपनी ओबायशीचे म्हणणे आहे, की चुंबकीय मोटरच्या मदतीने रोबोटीक कारला अंतराळात नेले जाईल. यातून सामानाप्रमाणेच अंतराळवीरांनाही पाठविता येईल. त्यामुळे प्रत्येक वेळी अंतराळयानाचे प्रक्षेपण करावे लागणार नाही. या लिफ्टच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाण्यासाठी सात दिवस लागतील.
पुढील स्लाईडवर बघा, स्पेस एलिव्हेटरचा ग्राफिक्स व्ह्यू.... बघा भविष्यात डोकावणारा व्हिडिओ...