आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने अणुचाचणी केल्यास विचार करावा लागेल, डील होताच जपानचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताने जपानबरोबर शनिवारी अणु नागरी करारावर सह्या केल्या. त्यानंतर काही वेळातच जपानने भारताला इशारा दिला की, जर भारताने अणुचाचणी केले तर कराराच्या भवितव्याबाबत आम्हाला विचार करावा लागेल. पण भारत असे करणार नाही, असा विश्वासही जपानकडून व्यक्त करण्यात आला आहे.

जपानचे म्हणणे काय...
- जपान सरकारचे प्रेस सेक्रेटरी यासुहिसा कवामरुरा यांना विचारण्यात आले की, भारताने जर अणुचाचणी केली तर त्यावर जपानची प्रतिक्रिया काय असेल?
- याचे उत्तर देताना ते म्हणाले की, तुम्हीच सांगा आम्ही काय करायला हवे. जर भारताने अणुचाचणी करून वचनभंग केला तर आम्हालाही सहकार्य कराराचा पुनर्विचार करावा लागेल.
- या करारानुसार असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे की, भारत अणुऊर्जेचा वापर शांतीपूर्ण पद्धतीने करण्याची जबाबदारी पार पाडेल.

अणु करारावर मोदींचे मत
जपानबरोबरच्या अणु कराराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये विनालष्करी अणु सहकार्य करार झालेला आहे. हा केवळ उद्योग आणि क्लीन एनर्जीसाठीचा करार नाही तर शांतीपूर्ण आणि सुरक्षित जगासाठी एका नव्या सुरुवातीचे प्रतिक आहे.

या देशांबरोबर आहे भारताचा अणुसहकार्य करार
- अमेरिका- 2005 (123 करार)
- फ्रान्स - 2008
- रशिया - 2009
- मंगोलिया- 2009
- नामिबिया - 2009
- कॅनाडा - 2010
- अर्जेंटीना, ब्रिटन, कझाकिस्तान आणि दक्षिण कोरियाबरोबरही अणु करार केला आहे.