आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानचे PM आज दिल्लीला पोहोचणार, बुलेट ट्रेनसह अनेक करार अपेक्षित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचे तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज दुपारी भारतात आगमन होत आहे. आबे यांच्या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये बुलेट ट्रेन बरोबरच अनेक करार होण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात आबे बाराणसीलाही भेट देणार आहे. याठिकाणी आबे पीएम मोदींसह गंगा आरतीमध्ये सहभागी होतील. आबे शुक्रवारी दुपारी दिल्लीला पोहोचतील. 4 वाजता त्यांची भेट परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याबरोबर होणार आहे.
दौऱ्याचा उद्देश ?
- भारत-जपान दरम्यान 9 वी वार्षिक बैठक शनिवारी (12 डिसेंबर) होईल. यात मोदी आणि आबे गेल्या एका वर्षात विशेषतः उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रातील निर्णयांचा आढावा घेतली.
- 98,000 हजार कोटींच्या बुलेट ट्रेन प्रोजेक्ट सुरू करण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
- पहिली बुलेट ट्रेन मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान चालवण्याचा प्रस्ताव आहे. 2024 पर्यंत पहिली बुलेट ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.
- आबे मोदींबरोबर वाराणसीला जातील. दशाश्वमेध घाटावर ते गंगा-आरतीमध्ये सहभागी होतील.
- दिल्लीमध्ये ते भारत-जपान नात्यांशी संबंधित एका चर्चासत्रात सहभागी होतील. आबे देशाच्या बड्या उद्योगपतींची भेटही घेणार आहेत.
- जपानचे पंतप्रधान राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनाही भेटतील.

54 वर्षांनी जागतिक नेता वाराणसीला जाणार
- वाराणसीमध्ये सुमारे 54 वर्षांनंतर एखादा मोठा जागतिक नेता येत आहे.
- यापूर्वी 1961 मध्ये ब्रिटनची राणी क्वीन एलिजाबेथ याठिकाणी आल्या होत्या.

नावेवर चर्चा आणि सुरक्षा व्यवस्था
- घाटावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी स्थानिक प्रशासनाने मंजुरी दिली आहे. मात्र या नियमांचे सक्तीने पालन होणे गरजेचे आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे स्टेज आर्मी आणि नेव्हीच्या ताब्यात राहतील. दोन दिवस याठिकाणी असलेल्या नाविकांनाही घाटावर जायला परवानगी मिळणार नाही.
- मोदी आणि शिंजो हेदेखिल नेव्हीच्या बोटवर बसून चर्चा करतील. घाट, मंदिर आणि महालांवर शार्ट शूटर तैनात असतील.
- ड्रोन आणि 120 सीसीटीविही कॅमेऱ्यांनी निगरानी केली जाईल. जपानचे सेक्युरिटी एजंट्स तीन दिवसांपूर्वीच येथे पोहोचले आहेत.

मोदी-आबे यांच्या बेटीचे नियोजन
-12 डिसेंबरला दुपारी 3.30 वाजता वाराणसीमध्ये पोहोचतील.
- ताज हॉटेलमध्ये थांबणार, सायंकाळी काशी विश्वनाथ मंदिरात जातील.
- गंगा आरतीमध्ये सहबागी होणार.
- ताज हॉटेलमध्ये पाहुण्यांसाठी खास डिनर.