(छायाचित्र : भारतीय युद्धकैद्यांवर नेम धरणारे जपानचे सैनिक )
नॅशनल डेस्क - 'हिरोशिमा डे' निमीत्त आज संपूर्ण जगभर जपानच्या हिरोशिमा शहरावर अमेरिकेकडून झालेल्या क्रूर हल्ल्याच्या आठवणी ताज्या होत आहेत. मात्र, जपानची दुसरीबाजू देखील आहे. अमेरिकेकडून झालेला अमानवीय हल्ला सहन करणार्या जपानच्या सैनिकांनी महायुद्धादरम्यान भारतीय बंदीवानांसोबतही असाच दुर्व्यवहार केला होता.
1942 च्या महायुद्धादरम्यान जपानचे सैनिक युद्धाभ्यासावेळी भारतीय बंदीवानांचा 'टार्गेट' म्हणून वापर करत होते. छायाचित्रत तुम्ही पाहू शकता की ब्रिटीश इंडियन आर्मीच्या शीख रेजिमेंटचे सैनिक पारंपरिक पुजा करतानाच्या स्थितीत बसलेले आहेत आणि जपानचे सैनिक त्यांच्यावर संगिनी ताणून उभे आहेत.
दुसर्या महायुद्धात जपानने सिंगापूरमध्ये ब्रिटीश सैन्यातील शीख सैनिकांना मोठ्या प्रमाणात बंदीवान केले होते. ब्रिटीश आर्मीने जेव्हा पुन्हा सिंगापूरवर कब्जा केला होता तेव्हा या सैनिकांना त्यांनी जपानच्या रेकॉर्डवर पाहिले होते.
भारतीय बंदिवान होते टार्गेट, सगळ्यांच्या पुढे होते मार्कर
प्रत्येक युद्ध कैद्याला एक मार्कर लावला जात होता आणि त्यावर रायफल किंवा बंदुकीतून निशाणा साधला जात होता. प्रत्येक टार्गेटला एक क्रमांक दिला जात होता.
टार्गेट चुकले की डिमोशन
भारतीय युद्धबंद्यांवर जपानचे सैनिक टार्गेट प्रॅक्टिस करत होते. यात जर सैनिकाचा नेम चुकला आणि युद्धबंदी जिवंत राहिला, तर गोळी मारणार्या सैनिकाची पदावनती (डिमोशन) नक्की होती.
नाझींपेक्षाही भयानक होते जपानी सैनिक
पूर्व भागात जपानकडून झालेली कारवाई भयावह करणारी होती. आजही त्या आठवणींनी अंगावर काटा येतो. दुसर्या महायुद्धाच्या सुरवातीला जपानकडून अमानवीय यातना देण्यात आल्या होत्या. आपल्याला फक्त नाझींची क्रुरता माहित आहे. मात्र जपानच्या सैनिकांचे कारनामे त्यांनाही लाजवणारे होते. नाझींनी जेवढ्या यहुदींना ठार मारले त्याच्या दुप्पट चीनींना जपानच्या सैनिकांनी हालहाल करुन मारले होते. नाझींकडून अनियमीत सैनिक हे कृत्य करत होते, जपानचे मात्र नियमीत सैनिकच माणुसकीवर घाला घालण्याचे काम करत होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, जपानच्या क्रौर्याची ग्वाही देणारी काही दुर्मिळ छायाचित्रे