आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jaswant Singh Sulking Bjp Latest News Election 2014

भाजपमध्ये बंडाळी : जसवंत सिंह यांचे बंडखोरीचे संकेत, सोमवारी खोलणार पत्ते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षात नवे लोक ज्या प्रमाणे येत आहेत, त्याच प्रमाणात पक्षातील ज्येष्ठांचा असंतोष बाहेर येत आहे. शनिवारी ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेसकडून खासदार राहिलेले एम.जे.अकबर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचवेळी पक्षातील ज्येष्ठ नेते आणि परराष्ट्र राहिलेले जसवंतसिंह यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहेत.
जसवंतसिंह यांचे बाडमेर लोकसभा मतदारसंघातील तिकीट पक्षाने शेवटच्या क्षणी कापले. बाडमेरच काय, त्यांना राजस्थानातील कुठल्याच जागेवरून उमेदवारी दिली गेली नाही. आज (शनिवार) जोधपूर येथे आल्यानंतर त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, या निवडणूकीत ख-या आणि खोट्या भाजपमध्येच लढाई होत आहे. भाजपचे दोन तुकड्यांमध्ये विभागली गेली असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, एक खरा पक्ष आहे तर दुसरा नकली. अस्सल भाजपमध्ये बाहेरच्या लोकांनी आतिक्रमण केले आहे. पक्षाच्या घटनात्मक चौकटी बाहेर जाऊन निर्णय घेतले जात आहेत. या निवडणुकीत आता जनताच खरा भारतीय जनता पक्ष कोणता याचा निर्णय घेईल. पक्षाला सोडचिठ्ठी देऊन बाडमेर मधून अपक्ष निवडणूक लढविणार का, यावर येत्या 24 तारखेला पत्ते उघड करु, असे ते म्हणाले.

जसवंतसिंह यांचा रविवारी रोड शो
जसवंतसिंह रविवारी जोधपूरहून जैसलमेर मार्गे बाडमेरकडे निघणार आहेत. त्यांचा हा नि्व्वळ प्रवास नसून ते शक्तीप्रदर्शन आणि रोड शो करणार आहेत. त्यांच्या निकटवर्तीय सुत्रांच्या माहितीनुसार, 24 रोजी ते बाडमेरमध्ये जाहीर सभा घेतील. याचवेळी ते भाजपला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा करु शकतात. त्यानंतर ते अपक्ष उभे राहातील.
छायाचित्र - शनिवारी बाडमेर येथे जसवंतसिंह समर्थकांनी मोदींचे बॅनर फाडून टाकले.

पुढील स्लाइडमध्ये, यासाठी घेऊ शकतात माघार...