आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपमध्ये व्यक्तीपूजेचे स्तोम, व्हिजनचा विसर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. ज्येष्ठ भाजप नेते जसवंतसिंग यांना भाजपमधून बडतर्फ करण्यात आल्यानंतर दुस-याच दिवशी त्यांनी एक निवेदन जारी करून भाजपवर कडाडून हल्ला चढवला आहे. क्षणैक राजकीय स्वार्थासाठी भाजपने आपली मूल्य आणि व्हिजनही गुंडाळून ठेवले असल्याचे जसवंतसिंग यांनी म्हटले आहे.


मूल्यांबाबत कमालीचा गोंधळ
अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी आणि भैरवसिंग शेखावत यांनी ज्या संकल्पेनेतून भाजप स्थापन केली. ती संकल्पना केव्हाच धुळीस मिळाली आहे. मूल्ये, निकष आणि अस्वीकारार्ह शॉर्टकट्सवरून पक्षात कमालीचा गोंधळ माजलेला आहे, त्यामुळे पक्ष उभारणीत स्वत:ला झोकून दिलेले निष्ठावंत सैरभैर झालेले आहेत, असे जसवंतसिंग यांनी म्हटले आहे.


निष्ठावंतांचा अनादर भोवणार
भाजपमध्ये अत्यंत निष्ठावंतांशीही सौजन्याने वागले जात नाही. क्षणिक राजकीय स्वार्थासाठी निष्ठावंतांची गळचेपी करून त्यांना खड्यासारखे बाजूला सारले जात आहे. त्याचे परिणाम काय होतील, हे येणारा काळच सांगेल, असे या निवेदनात म्हटले आहे.


राजनाथांच्या नेतृत्वाचा बळी
भाजप हा राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षीय नेतृत्वाचा बळी ठरत चालला आहे, याची पूर्वकल्पना मी आधीच पक्षाला दिली होती. स्वत:च्या महत्वकांक्षा पूर्णत्वास नेण्यासाठी राजनाथ नको त्या तडजोडी करत आहेत. राजनाथ सिंहांना मी पक्षात अडथळा वाटत होतो. त्यांच्या मनात माझ्याबाबत भिती निर्माण झाली होती.


हा तर मोदींच्या विध्वंसक प्रवृत्तीचाच प्रभाव : काँग्रेस
जसवंतसिंग यांची भाजपमधून बडतर्फी हा नरेंद्र मोदी यांच्या स्वत:चा खड्डा स्वत:च खोदण्याच्या प्रवृत्तीचे लाक्षणिक उदाहरण असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. मोदींच्या या प्रवृत्तीचे दीर्घकालीन परिणाम भाजपलाच भोगावे लागतील, असेही काँग्रेसने म्हटले आहे.


‘‘व्यक्तिपूजेच्या स्तोमापुढे भाजपमध्ये निष्ठावंतांना किंमत राहिलेली नाही.क्षणिक राजकीय स्वार्थासाठी भाजपने आपले व्हिजन आणि मूल्यांना तिलांजली दिली आहे. पक्षशिस्तीच्या नावाखाली ज्या तत्वांवर आणि मूल्यांवर भाजपची उभारणी झाली आहे तिच कशी पायदळी तुडवली जात आहेत, याचे उत्तम उदाहरण ही निवडणूक आहे. ’’