आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Javadekar Interrogated In Case Of Gujrat Fake Firing

गुजरातमधील बनावट चकमक प्रकरणी जावडेकर यांची सीबीआय चौकशी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुजरातमधील तुलसीराम प्रजापती बनावट चकमकप्रकरणी भाजपचे राज्यसभा सदस्य प्रकाश जावडेकर आणि भूपेंद्र यादव यांची सीबीआयने चौकशी केली. नरेंद्र मोदी यांचे विश्वासू अमित शहा यांच्याविरोधातील खटल्यास कमकुवत करण्यासाठी प्रजापती यांच्या आईवर दडपण आणल्याचा आरोप या दोघांवर आहे. भूपेंद्र यादव यांची सकाळी चौकशी करण्यात आली, तर जावडेकर दुपारी दोन वाजता मुख्यालयात हजर झाले. दोघाही खासदारांनी चौकशी अधिकार्‍यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. या प्रकरणी भाजपचे सरचिटणीस रामलाल यांनाही पाचारण केले आहे.


प्रकरण काय आहे : मुक्त पत्रकाराने काही दिवसांपूर्वी तुलसीराम प्रजापती प्रकरणी सिं्टग ऑपरेशन केले होते. यामध्ये जावडेकर, भूपेंद्र यादव, रामलाल चर्चा करताना दिसतात. प्रजापती यांच्या आईकडून वकीलपत्र कसे बदलून घ्यावे याबाबत हे तिघे चर्चा करत होते. सोहराबुद्दीन बनावट चकमकीप्रकरणी साक्षीदार तुलसी याची 2006 मध्ये हत्या झाली होती.


बोलावले म्हणून आलो
कायद्याच्या प्रक्रियेवर माझा विश्वास आहे. सीबीआयने बोलावले म्हणून हजर झालो. प्रकाश जावडेकर, भाजप नेते