आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजपूत राजे इंग्रजांशी लढले नाहीत, आता रस्त्यावर उतरले आहेत: \'पद्मावती\' वादावर अख्तर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/मुंबई - पद्मावती चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर गीतकार जावेद अख्तर यांनी करणी सेना आणि माजी राजघराण्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. रविवारी लखनऊमध्ये एका न्यूज चॅनलशी बोलताना जावेद म्हणाले की, राजपूत-रजवाडे इंग्रजांशी तर कधी लढले नाहीत आणि आता रस्त्यावर उतरले आहेत. हे जे राणा आहेत, महाराजे आहेत, राजे आहेत राजस्थानचे, 200 वर्षांपर्यंत इंग्रजांच्या दरबारात उभे होते. पगड्या बांधून, तेव्हा त्यांचा राजपूती बाणा कुठे होता. हे राजाच यामुळे झाले कारण यांनी इंग्रजांची गुलामी स्वीकारली होती. तथापि, राजस्थानसहित देशभरात संजय लीला भंसाळीच्या चित्रपटाला विरोधानंतर निर्मात्यांनी रिलीज डेट 1 डिसेंबर टाळून ती पुढे ढकलली आहे. 

 

एक आम आदमी समाजात का घाबरेल?
- यादरम्यान जेव्हा जावेद यांना विचारण्यात आले की, आता करणी सेना तुमच्या मागे लागेल. तर ते म्हणाले- करणी सेनाच का? मी तर सामान्य राजपूतांचे म्हणणे ऐकायलाही तयार आहे. हे आपल्या प्रतिष्ठेबद्दल बोलतात. परंतु कोण आहेत हे? ही इंग्रजांची माणसे आहेत. हे राजाच आजपर्यंत यामुळे राहिले, कारण यांनी इंग्रजांची गुलामी केली.

- विरोधामुळे चित्रपटाचे डायरेक्टर-प्रोड्युसर झुकले आहेत का? यावर जावेद म्हणाले- एक आम आदमी समाजात का घाबरेल? पण ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे त्याच संस्था विरोधात उतरल्यावर काय करणार?


दीपिकाला जिवंत जाळण्यासाठी 1 कोटी देण्याची घोषणा
- दुसरीकडे, बरेलीमध्ये अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे नेता भुवनेश्वर सिंह यांनी पद्मावतीची अॅक्ट्रेस दीपिकाला जिवंत जाळण्यासाठी 1 कोटी रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. यामुळे करणी सेनेने या अॅक्ट्रेसचे नाक कापण्याची घोषणा केली होती.

 

यूपीचे उपमुख्यमंत्री म्हणाले- वादग्रस्त भाग वगळून चित्रपट रिलीज होईल...
- यूपीचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य म्हणाले की, पद्मावतीतून वादग्रस्त भाग वगळल्याशिवाय चित्रपटाला राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही. इस्लामी शासकांनी देशात खूप विध्वंस केला होता. राणीने आपल्या मर्यादा आणि सतीत्वाच्या रक्षणासाठी जौहर केला होता.
- त्यांनी म्हटले की, एका मीटिंगमध्ये ज्येष्ठ इतिहासकार, वरिष्ठ राजपूत नेते वा इतर काही जणांनी चित्रपटाला पाहून बदल करावे आणि सेन्सॉर करावे. यानंतरच चित्रपट रिलीज होईल. परंतु हे तर प्रत्येक चित्रपटाबाबत होईल. काही बडे लोक येतील, काही या समाजाचे, काही त्या समाजाचे, काही या धर्माचे, तर काही त्या धर्माचे. मग तर सेन्सॉर बोर्ड बरखास्त करा. ज्या समाजाबद्दल चित्रपट आहे त्या समाजाच्या नेत्यांकडे जावे लागेल आणि त्यांना दाखवून वाद संपवावा लागेल.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...