आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'भारत माता की जय\'ला नकार देणाऱ्या ओवेसींना अख्तर म्हणाले \'मोहल्ले का नेता\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जावेद अख्तर यांनी राज्यसभेत दिलेल्या अखेरच्या भाषणात एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसींवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी 'भारत माता की जय'चा नारा देण्यास नकार देणाऱ्या ओवेसींना 'मोहल्ले का नेता' म्हटले. त्यासोबत त्यांनी भाजप आणि मोदींनाही वडिलकीचा सल्ला दिला. ओवेसींनी महाराष्ट्रातील लातूरमध्ये वादग्रस्त भाषण केले होते, त्यामुळे ते चर्चेत आले होते.
ओवेसींनी लातूरमध्ये केलेल्या भाषणात मानेवर सुरी ठेवली तरी 'भारत माता की जय' म्हणणार नाही असे म्हटले होते.

काय म्हणाले प्रसिद्ध शायर राज्यसभेत
1#ओवेसींच्या 'भारत माता की जय' न म्हणण्यावर
- एक नेता स्वतःला राष्ट्रीय नेता समजत आहे, वास्तविक तो हैदराबादच्या एका मोहल्ल्याचा नेता आहे.
- 'भारत माता की जय' म्हणण्यात गैर काय आहे ? ते आमचे कर्तव्य नसून मुलभूत अधिकार आहे.
- मी म्हणतो 'भारत माता की जय', कोणी मला रोखले का ?

2#शेरवाणी आणि टोपीबद्दल संविधानात कुठे काय लिहिले आहे ?
- जावेद अख्तर यांनी फक्त ओवेसींनाच नाही तर जे-जे नेते चिथावणीखोर भाषणे करतात त्या सर्वांना सल्ला दिला.
- ते म्हणाले, 'जर भारतीय संविधानात 'भारत माता की जय' म्हणा असे लिहिलेले नाही तर त्यात शेरवाणी आणि टोपी घालण्यासही कुठे सांगितले आहे ?'
3#चिथावणीखोर बोलणाऱ्यांवर
- शाहरुख आणि आमिर यांना पाकिस्तानात चालते व्हा, म्हणणाऱ्या नेत्यांनाही त्यांनी फटकारले. अख्तर म्हणाले,'मी जर माझ्या मनातील काही सांगत असेल तर त्यावर लोक पाकिस्तानात चालते व्हा म्हणणार असतील तर त्यांची मी निंदा करतो. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे.'
अल्पसंख्याकांबद्दल चिथावणीखोर बोलणाऱ्यांवरही अख्तर यांनी हल्ला चढवला. सत्ताधाऱ्यांकडे कटाक्ष टाकत ते म्हणाले, 'काही लोक म्हणतात, मुस्लिमांची दोनच ठिकाणे.. कब्रस्तान आणि पाकिस्तान. मी त्यांचाही तेवढ्याच जोरकस निषेध करतो.'
- 'आम्हाला असा देश हवा आहे जो सर्वांना बोलण्याचे स्वातंत्र्य देईल.'

4#सरकार आणि विरोधकांमधील वादावर
जावेद अख्तर म्हणाले, 'उर्दूचे फार मोठे शायर मजाज काश्मीरला गेले. कोणीतरी त्यांना विचारले की निर्सर्गाचे सौंदर्य पाहिले का ? ते म्हणाले.. होय पाहिले फार चांगले वाटले, फक्त मधे मोठमोठे डोंगर आले. ... येथे (राज्यसभा) देखिल फार तहकुबीचे क्षण आले, नाही तर अधिक काही ऐकता आले असते.'
- ते म्हणाले, 'सरकार तर त्या देशांमध्येही आहे जिथे हुकुमशाही आहे. मात्र लोकशाही आणि त्या सरकारांमध्ये फरक काय आहे ? तिथे फक्त सरकार असते. येथे सरकार आणि विरोधीपक्ष दोन्ही आहेत. रंग आणि गंध मिळूनच बगिचा तयार होतो.. हम ही हम हैं तो क्या हम हैं... तुम ही तुम हो तो क्या तुम हो...
विरोधीपक्षाने वीज, रस्ते, पाणी आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकारला साथ दिली पाहिजे.'
5#वेळच तर खराब आहे...
- जावेद अख्तर यांना अजून बरेच काही बोलायचे होते मात्र सभापतींनी त्यांना थांबवले. मंगळवारी राज्यसभेतील 17 सदस्य निवृत्त झाले त्यात अख्तर यांचाही समावेश होता.
- सभापतींनी जावेद अख्तर यांना वेळेची आठवण करुन देताना म्हटले, जावेद साहेब दुर्देवाने माझे लक्ष्य घड्याळावर आहे, तेव्हा ते म्हणले, 'होय, वेळच तर खराब आहे.'
- 15 मिनिटांच्या भाषणात अख्तर यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्ष केला. लोकशाहीबद्दल चिंता व्यक्त करताना ते म्हणाले,'सेक्युलॅरिझम शिवाय लोकशाही शक्य नाही. कोणत्याही विशेष समुदायाला सपोर्ट न करता आपण सेक्युलॅरिझमचे रक्षण केले पाहिजे.'
पुढील स्लाइडमध्ये VIDEO, काय म्हणाले होते ओवेसी