आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेलमध्येच राहाणार जयललिता, कर्नाटक हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई / बंगळुरु - बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चार वर्षांची शिक्षा झालेल्या अण्णाद्रमुकच्या प्रमुख जयललिता या तुरुंगातच राहाणार आहेत. कर्नाटक हायकोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला असून, भ्रष्टाचारासारख्या गंभीर प्रकरणात जामीन देणे चुकीचे असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. मंगळवारी दिवसभर चाललेल्या सुनावणीनंतर कोर्टाने निर्णय दिला आहे. त्याआधी जयललिता यांना जामीन मिळाल्याची अफवा पसरली होती. जामीन मिळाल्याचा आनंद जयललिता समर्थकांनी फटाके फोडून साजरा केला होता.
अशी पसरली अफवा
जयललितांच्या जामीनाची अफवा त्यांच्या अतिउत्साही समर्थकांमुळे पसरली. सूत्रांच्या माहितीनुसार, 'कोर्टामध्ये जेव्हा निर्णयाचे वाचन सुरु होते, तेव्हा बचावपक्षाचे वकील जी. भवानी सिंह यांनी सशर्त जामीनाला विरोध केला नाही. त्यानंतर समर्थकांनी सशर्त जामीन मंजूर झाल्याचे जिकडे -तिकडे सांगण्यास सुरवात केली. मात्र, न्यायाधिश ए.व्ही. चंद्रशेखर यांनी जयललिता यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.'
दिवसभराचा घटनाक्रम
जयललितांच्या जामीन अर्जावरील युक्तिवादानंतर कर्नाटक हायकोर्टाने दुपारी 2.30 पर्यंत निर्णय स्थगित ठेवला होता. जयललितांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ राम जेठमलानी यांनी बाजू मांडली. तर, विरोधात निर्णय आला तर समर्थक संतप्त होऊन अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. न्यायालय परिसरात कलम 144 लागू करण्यात आले होते.
जयललिता यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणामध्ये चार वर्षांचा तुरुंगवास आणि 100 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांनी विशेष न्यायालयाच्याया निर्णयाला हायकोरटात आव्हान दिले असून, जामीनासाठी अर्जही केला. जयललिता यांच्याशिवाय त्यांच्या तीन नीकटवर्तीयांनाही तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पोस्टर वादावरुन अण्णाद्रमुकने हात झटकले
अण्णाद्रमुकच्या एका खासदाराने 'अम्मा'ला जामीन मिळाला नाही, तर कन्नड भाषिकांना ओलिस ठेवण्याची धमकी देणारे पोस्टर चेन्नईत ठिकठिकाणी लावले होते. (पुढील स्लाइडमध्ये पाहा पोस्टर) एआयएडीएमके चे खासदार कुमार, तामिळनाडूचे विद्यमान मंत्री वरमाथी आणि आमदार कलाईरंजन यांची त्या वादग्रस्त पोस्टरवर नावे आहेत. त्यावरुन वाद सुरु झाल्यानंतर हे पोस्टर काढून घेण्यात आले. तर, अण्णाद्रमुकचा त्याच्याशी काही संबंध नसल्याचे पक्ष प्रवक्त्याने म्हटले आहे. ते म्हणाले, 'स्वस्तात प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे पोस्टर लावण्यात आले आहे. याविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.'

(जयललिता यांना जामीन मिळाल्याची अफवा पसरल्यानंतर त्यांचे उत्साही समर्थक)
पुढील स्लाइडमध्ये पाहा, समर्थकांनी लावलेले वादग्रस्त पोस्टर आणि चेन्नईच्या रस्त्यांवर शुकशूकाट