आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयललितांचा संशयास्पद मृत्यू; न्यायालयाने फेटाळल्या याचिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमार्फत न्यायिक चौकशी करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावल्या. त्यात अद्रमुकमधून निलंबित केलेल्या राज्यसभा खासदार शशिकला पुष्पा यांचा समावेश आहे.
  
अशीच एक याचिका मद्रास उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे. त्यामुळे आम्ही या प्रकरणावर सुनावणी करणार नाही, याचिका फेटाळत आहोत, असे न्यायमूर्ती पी. सी. घोस आणि आर. एफ. नरिमन यांच्या खंडपीठाने सांगितले. पुष्पा यांच्याशिवाय एका एनजीओनेही अशीच मागणी करणारी याचिका दाखल केली होती.  पुष्पा यांनी १८ डिसेंबर २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तीत म्हटले होते की, जयललितांच्या मृत्यूबद्दलची वस्तुस्थिती जाहीर करण्यात आली नाही, त्यांची भेट घेण्याची परवानगी कोणालाही देण्यात आली नव्हती. त्यांना दाखल करण्यापासून मृत्यूपर्यंत सर्वकाही गोपनीय ठेवण्यात आले. त्यांचा मृत्यू संशयास्पद आहे. आरोग्य अहवाल, उपचारांची माहिती सीलबंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्याचे निर्देश केंद्र, तामिळनाडू सरकार व अपोलो रुग्णालयाला द्यावी. 
 
 
बातम्या आणखी आहेत...