आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाही थाटात जगतात जयललिता, दत्तक पुत्राच्या लग्नात पाण्यासारखा वाहिला पैसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ज्ञात स्त्रोतांपेक्षा अधिक संपत्ती सापडल्याच्या प्रकरणात तामिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललिता दोषी ठरल्या आहेत. बंगळुरु येथील विशेष न्यायालयाने त्यांना चार वर्षांचा तुरुंगवास आणि 100 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. जयललिता या एकेकाळच्या दाक्षिणात्य अभिनेत्री राहिलेल्या आहे. शाही जीवनशैलीसाठी त्या ओळखल्या जातात.

1996 मध्ये त्यांच्या घरावर छापा पडला होता तेव्हा 28 किलो सोने, 896 किलो चांदी आणि 10 हजार साड्या, 750 चपलांचे जोड आणि 51 महागड्या घड्याळ जप्त करण्यात आल्या होत्या. यावरुन त्यांच्या जीवनशैलीचा अंदाज लावता येऊ शकतो.
चित्रपटांच्या ग्लॅमरस जगतातून आलेल्या जयललिता या थाटात राहातात आणि त्यांच्या सोबतच्या लोकांवरही त्या दौलत उधळतात अशी त्यांची ख्याती आहे. 1995 मध्ये त्यांनी दत्तक पुत्र सुधाकरनच्या लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. सुधाकरनच्या लग्नाच्या पंगतीसाठी त्यांनी 10 डायनिंग हॉल बुक केले होते. तिथे जवळपास दीड लाख लोक बसून जेवण्याची व्यवस्था होती. पाहुण्यांच्या राहाण्यासाठी तामिळनाडूच्या विविध हॉटेल्सच्या 1000 खोल्या बुक केल्या होत्या तर त्यांच्या नेण्या-आणण्यासाठी 300 एसी गाड्या तैनात होत्या. विवाह स्थळापर्यंत जाणार्‍या दोन किलोमीटर रस्त्यावर 50 लाख रुपये खर्च करून रोषणाई करण्यात आली होती.
अम्मा ब्रँडला झटका
विशेष न्यायालयाच्या शनिवारच्या निर्णयामुळे जयललिता समर्थकांना मोठा झटका बसला आहे. तामिळनाडूमध्ये अनेक वस्तू अम्मा ब्रँडने स्वस्त दरात उपलब्ध करुन दिल्या जातात, त्या योजनांना आता लगाम लागू शकतात. जयललिता लवकरच तामिळनाडूमध्ये अम्मा सिनेमा, सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अम्मा स्कूल बॅग आणि अम्मा चहा यासारख्या योजना सुरु करण्याची योजना आहे. त्यावर आता प्रश्न निर्माण झाला आहे.
(छायाचित्र : जयलिलता जिथे जातात तिथे त्या या खास खुर्चीवरच बसतात, ती खुर्ची घेऊन जाताना सुरक्षा कर्मचारी)