आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jayalalitha Will Boycott Modi Swearing In MDMK Will Follow Suit

शहीद हेमराजची पत्नी म्हणाली, नवाज शरीफ माझ्या पतीचे शीर परत घेऊन येणार का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाच्या भावी पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळयासंदर्भात अनेक वाद होताना दिसत आहेत. एकिककडे तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी भाजपचा प्रमुख घटकपक्ष असणा-या शिवसेनेचे मंत्रीही या सोहळ्यात शपथ घेणार नसल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना यासंदर्भात सायंकाळी सहा वाजेपर्यंत निर्णय घेण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे सीमेवर पाकिस्तानी लष्कराच्या क्रौर्याचा बळी ठरलेले शहीद हेमराज यांच्या पत्नीनेही मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी शरीफ यांना आमंत्रण पाठवल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

धर्मवती उपोषण करणार
नवाज यांना आमंत्रण पाठवण्याच्या निर्णयावर टीका करत हेमराज यांच्या पत्नी धर्मवती यांनी पाकिस्तानने आपले पती हेमराज यांचे शीर परत करावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे धर्मवती या सोमवारी उपोषण करण्याच्या विचारात आहेत. नवाज शरीफ भारतात आल्यापासून ते देशाबाहेर जाईपर्यंत त्या उपोषण करणार असल्याचे सांगितले जात आहे. 'शरीफ यांनी एक तर आपल्या पतीचे शीर घेऊन यावे, किंवा पाकिस्तानच्या लष्कराने केलेल्या या क्रौर्याचा जाहीरपणे निषेध करावा, असे त्यांचे म्हणणे आहे.

भाजपला मत दिले होते
गेल्या वर्षी 8 जानेवारी रोजी सीमेवर पुंछ परिसरात लांस नायक हेमराज यांची हत्या करण्यात आली होती. हेमराज यांच्या पत्नी पुढे म्हणाल्या की, 'मोदी यांनी शरीफ यांना बोलवायला नको होते. मोदी यांना मथुरा येथे सभेमध्ये या प्रकरणात मनमोहनसिंग सरकारने उचललेल्या पावलावर जोरदार टीका केली होती. तसेच त्यांनी भाषणात पाकिस्तानला आव्हानही दिले होते. मी माझे मत भाजपला दिले होते.' शरीफ यांना बोलावणे म्हणजे सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचा अपमान असल्याचेही त्या म्हणाल्या. जनरल व्ही के सिंग यांनी त्यावेळी या घटनेचा बदला घेतला जाईल असे म्हटले होते, अशी आठवणही त्यांनी करून दिली.
पुढे वाचा... राजपाक्षे यांना दाखवणार काळी झेंडी