आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jayanthi Natarajan's Sudden Resignation From Ministry Stirs Controversy

मला हटवण्यात आलेले नाही, स्वत:हून राजीनामा दिला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षकार्याची इच्छा असल्याचे सांगून जयंती नटराजन यांनी शनिवारी वने व पर्यावरण राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. परंतु दबावाखाली त्यांनी हे पाऊल उचलल्याची बातमी प्रसिद्ध झाली. त्यावर मला हटवण्यात आलेले नाही, तर मी मर्जीनेच राजीनामा दिला आहे, असे नटराजन यांनी स्पष्ट केले.
नटराजन यांनी बड्या प्रकल्पांना मान्यता देण्यास दिरंगाई केली. उद्योगक्षेत्रातील अनेक कंपन्यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यामुळेच पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्यांचा राजीनामा मागितला, असे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे. त्यावर नटराजन म्हणाल्या, मी कोणताही प्रकल्प अडवून ठेवलेला नाही. पंतप्रधानांनीही माझ्या कामाचे कौतुक केलेले आहे.