आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jaylalita Itr Return Dispute Latest News Marathi

सुप्रीम कोर्टानेही नाही दिला दिलासा, जयललितांना आयटी रिटर्न न भरणे पडणार महागात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) न भरल्याप्रकरणी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना सुप्रीम कोर्टाने झटका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी जयललिता यांना कोणताही दिलासा दिलेला नाही त्यामुळे आता त्यांना खटल्याला सामोरे जावे लागणार आहे. न्यायाधीश के.एस. राधाकृष्णन यांच्या पीठाने कनिष्ठ न्यायालयाला चार आठवड्यात हे प्रकरण निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत.
काय आहे प्रकरण
जयललिता यांनी शशिकला यांच्यासह शशि इंटरप्रायजेस नावाची कंपनी स्थापन केली होती. मात्र या कंपनीने किंवा तिच्या भागीदारांनी 1991-92m 1992-93 आणि 1993-94 चा आयकर भरलेला नाही.
या प्रकरणी आर्थिक गुन्हे न्यायालयात दाखल खटल्यात जयललिता यांनी, मला त्या कंपनीपासून कोणतेही उत्पन्न झालेले नसल्याचे सांगत आरोप फेटाळले होते. त्यासोबतच उत्पन्न न झाल्यामुळे कर भरला नसल्याचे त्या म्हणाल्या होत्या. त्यामुळे इन्कम टॅक्स भरला नसल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवता येत नाही आणि आयटीआर दाखल न करणे हा काही गुन्हा नाही. आर्थिक गु्न्हे न्यायालयाने त्यांचे अपिल फेटाळले आणि जयललिता आणि शशिकला यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच निर्णय दिला होता. या निर्णयाच्या विरोधात त्यांनी हायकोर्टात दाखल केलेले अपिल फेटाळण्यात आले होते. हायकोर्टाने आर्थिक गुन्हे न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य असल्याचे म्हटले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टात गेलेल्या जयललिता यांना न्यायाधीशांनी हायकोर्टाच्या निर्णयात दखल देण्यास नकार दिला आहे.