आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आली जयललिता यांची \'सीक्रेट\' कन्या, \'फेसबुक\'वर फोटो झाला व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्या रामनाथन राघवन - Divya Marathi
दिव्या रामनाथन राघवन
नवी दिल्ली- तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाला एक आठवडा होत नाही तोच त्यांची सीक्रेट कन्या जगासमोर आली आहे. हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल. पण, ही अफवा आहे. सोशल मीडिया साईट 'फेसबुक'वर एका महिलेचा फोटो व्हायरल झाला आहे.

फेसबुकवर एका महिलेचा फोटो शेअर करून तिला जयललितांची सीक्रेट कन्या संबोधले आहे. इतकेच नाही तर, या महिलेला अम्मा यांच्या कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टीचा वारसदारही सांगितले जात आहे.

कोण आहे ही महिला, काय आहे या मागील सत्य...?
- फेसबुकवर व्हायरल झालेल्या फोटोतील महिला आणि जयललिता यांच्या चेहर्‍यात बरेचसे साम्य आहे. दिव्या रामनाथन राघवन असे या महिलेचे नाव आहे.
- ती ऑस्ट्रेलियात राहाते. व्हायरल पोस्टमध्ये जयललिता यांच्या खासगी आयुष्याविषयीही सांगण्यात आले आहे.
- अमेरिकन अँकर चिन्मयी श्रीपदा हिने फेसबुकवर या अफवेचे खंडन केले आहे. सोबतच तिने ही पोस्ट फेसबुकवरून डिलीट करण्‍याची मागणी केली आहे.

काय म्हणाली चिन्मयी?
- चिन्मयी हिने सांगितले, जयललिता यांची सीक्रेट कन्या संबोधण्यात येत असलेली महिला संगीताचा वारसा असलेल्या कुटुंबाशी संबंधित आहे.
- ख्यातनाम मृदंगम तज्ज्ञ व्ही.बालाजी यांची ती नातेवाईक आहे. यूजर्स काहीही विचार न करता, फेसबुकवर अशा प्रकारच्या पोस्ट शेअर करतात.
- चिन्मयीची पोस्ट देखील व्हायरल झाली असून आतापर्यंत ती 9000 वेळा शेअर करण्यात आली आहे.

दीर आला समोर, मागितली माफी...
- चिन्मयीची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर दिव्याचा दीर त्रिवन्द्रम व्ही बालाजी समोर आले आहे. त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करून चिन्मयीचे आभार मानले आहे.
- फोटोतील महिला जयललिता यांची कन्या नसून आपली वहिनी असल्याचे त्रिवन्द्रम व्ही बालाजी यांनी म्हटले आहे.


पुढील स्लाइड्‍सवर पाहा, फेसबुकवर जयललिता यांची सीक्रेट कन्या म्हणून शेअर करण्यात आलेल्या दिव्या रामनाथन राघवन यांचे फोटो...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...