आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • JD (U) Expels Sabir Ali For Praising Modi News In Marathi

मोदींची स्तुती करणार्‍या साबिरची हकालपट्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जदयूने आपले राज्यसभा सदस्य साबिर अली यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. साबिर यांनी नरेंद्र मोदी यांच्या धोरणाची स्तुती केल्यामुळे त्यांना पक्षातून काढण्यात आले आहे. साबिर यांना केवळ सहा वर्षांसाठी नव्हे तर कायमचे काढण्यात आले आहे, असे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते के.सी.त्यागी यांनी स्पष्ट केले आहे. संपूर्ण देश जातीयवादाच्या विरोधात लढत असताना मोदींची स्तुती करणे म्हणजे राजकीय गुन्हा ठरतो. त्यांचे वक्तव्य दंगलग्रस्तांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. शिवहर मतदारसंघातून साबिर यांना उमेदवारी मिळणार होती. परंतु ती आता रद्द करण्यात आली आहे. दुसरीकडे साबिर म्हणाले, जे लोक मौना बाबा यांची दलाली करत आहेत. आता ते आम्हालाच पक्षातून काढणार का ? कोणीतरी के. सी. त्यागी म्हणतायत त्यांनी मला पक्षातून काढले आहे. हे असे लोक आहेत, जे पालिकेच्या निवडणुकीतही उतरू शकत नाहीत. लवकरच मौना बाबा व्हेंटिलेटरवर असतील. सक्षम नेतृत्वाच्याच हाती देश असावा, असे आम्हाला वाटते.