आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JDU मध्ये दुफळीची दाट शक्यता; नितीश यांची सरकारी पार्टी, खरा पक्ष माझ्यासोबत: यादव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- बिहारमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी जनता दल (संयुक्त) पक्षात दुफळीची चिन्हे दिसू लागली आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद यादव तीन दिवसांच्या दौऱ्यावर असून ते नितीश कुमार यांच्या भूमिकेबद्दल जनतेशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत तणाव वाढला आहे.  नितीश कुमार सरकारी पार्टी चालवत आहेत. माझ्यासोबत खरा पक्ष असल्याचा दावा शरद यादव यांनी केला आहे. 

नितीश कुमार यांनी राजदसोबतची आघाडी तोडल्यानंतर शरद यादव यांनी या भूमिकेला असलेला विरोध त्यांनी जाहीरपणे पहिल्यांदाच व्यक्त केला. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शरद यादव राजधानीत दाखल झाले. महाआघाडीतून झालेल्या काडीमोडावर ते तीन दिवसांत सामान्य जनतेशी संवाद साधणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. परंतु यादव यांच्या दौऱ्यापासून जदयूच्या नेत्यांनी ‘सुरक्षित’ अंतर राखले आहे. शरद यादव यांच्यासोबत केवळ त्यांचे काही विश्वासू सहकारी आणि काही कार्यकर्ते दिसून आले. शरद यादव यांचे पाटणा विमानतळावर स्वागत झाले तेव्हा त्यांचे मोजके सहकारी आणि राजदच्या समर्थकांचीच अधिक उपस्थिती दिसून आली. 
 
जनतेच्या विश्वासाला तडा 
 संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, की 11 कोटी जनतेने महागठबंधनवर विश्वास व्यक्त केला होता. त्यांच्या विश्वासाला तडा गेला आहे. त्यामुळे जनतेत जाऊन त्यांच्या भावना जाणून घेणार आहे. तीन दिवसांच्या दौऱ्याची कोणतीही पूर्व तयारी नसल्याचे त्यांनी सांगितले. यादव म्हणाले, जिथे लोक दिसतील तिथे उभे राहून त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे. माइक असेल तर ठिक नसेल तरीही काही हरकत नाही. 
 
जनतेचा कौल जाणून घेणार 
- संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद यादव गुरुवारपासून बिहारच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. ते 8 जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. 
- दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात शरद यादव पाटणा, सोनपूर, मुझफ्फरपूर येथे कार्यकर्त्यांची भेट घेणार आहे. दुसऱ्या दिवशी मुझफ्फरपूर, दरभंगा, मधुबनी येथे जातील. शेवटच्या दिवशी ते सुपौल, सहरसा आणि मधेपुराचा दौरा करणार आहेत. 
- काँग्रेस आणि आरजेडीसोबतचे महागठबंधन तोडून जेडीयूने एनडीएसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय जनता आणि कार्यकर्त्यांना पटला आहे का, याची ते पाहाणी करणार आहेत. 
- यानतंर 17 ऑगस्टला दिल्लीत एक परिषद होणार आहे. या परिषदेला विरोधीपक्षाच्या नेत्यांसह काही दलित आणि अल्पसंख्याक समाजाचे नेतेही उपस्थित राहाण्याची शक्यता आहे. 
- दुसरीकडे जेडीयूने शरद यादवांच्या या दौऱ्यापासून चारहात लांब राहाण्याचा पवित्रा घेतला आहे. 
 
शरद यादवांवर होणार पक्षविरोधी कृत्य केल्याची कारवाई 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, शरद यादव यांना पक्षातून निलंबित करण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव वाढत आहे. त्यांना पक्षातून निलंबित केले तर पक्षाचे राज्यसभेतील नेतेपदही सोडावे लागण्याची शक्यता आहे. 
- राज्यसभेत जेडीयूचे 10 खासदार आहेत. राज्यसभेत नवा नेता निवडीचे पक्षाचे प्रयत्न सुरु झाल्याचेही वृत्त आहे. 
- एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद यादव म्हणाले, महागठबंधन हा जनतेसोबतचा एक मोठा करार होता. तो तोडल्याने जनतेचा पक्षावरुन विश्वास उडाला आहे. 
बातम्या आणखी आहेत...