आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'...तर मोदींचा कान पकडत सत्तेतून बाहेर केले असते, अडवानींनी चित्रपट पाहावेत\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/पाटणा - भाजप आणि जदयू यांच्यातील संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले असून, भाजपने नरेंद्र मोदींकडे धुरा दिल्याने हे संबंध तुटण्याची मार्गावर आहे. जदयूचे नेते आता उघड गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उतरले आहेत. या नेत्यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट होत आहे की, भाजपच्या प्रचारसमितीच्या अध्यक्षपदी झालेली निवड जदयूला मुळीच पसंत पडलेली नाही. मात्र रविवारी मोदींच्या निवडीनंतर जदयूने हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असल्याचे म्हटले होते. मात्र लालकृष्ण अडवानींच्या नाराजीनाम्यानंतर जदयूचे नेत्यांनी मोदीविरोधात दंड थोपाटल्याचे दिसून येत आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मोदींच्या नावाला उघड विरोध केला नाही. मात्र जदयूला आता कळून चुकले आहे की, भाजप आता मोदींचेच नाव पंतप्रधानपदासाठी पुढे करेल. त्यामुळे जदयूने भाजपपासून दूर होण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

मोदींवर सगळ्यात मोठा शाब्दिक हल्ला जदयूचे प्रवक्ते शिवानंद तिवारी यांनी चढविला आहे. तिवारी म्हणाले, मोदी काँग्रेसला नेस्तनाभूत करण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्याच काँग्रेसच्या सरदार वल्लभभाई पटेल यांचे गुणगाण गात आहेत. जर 2002 च्या दंगलीच्या वेळी स्वर्गीय पटेल गृहमंत्री असते तर त्यांनी मोदींचा कान पकडत त्यांना सत्तेतून बाहेर काढले असते. मोदींच्या कारनाम्यामुळे पटेल यांचे नाव खराब होत आहे. पक्षाचे नेते आणि नितीशकुमार सरकारमध्ये मंत्री असलेले नरेंद्र सिंह यांनी आम्हाला दंगली घडवलेला नेता पसंत नसल्याचे म्हटले आहे. खासदार के सी त्यागी यांनीही मोदींना आमचा पक्ष स्वीकारणार नसल्याचे म्हटले आहे.

तिवारी यांनी अडवानी यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. तिवारी अडवानींच्या राजीनाम्यावर म्हणाले, अडवानी यांचे वय आता 85 च्या घरात आहे. या वयात त्यांनी राजकारणातून निवृत्त होऊन खरे तर आपला चित्रपट पाहण्याचा छंद जोपासायला हवा. तसेच मार्गदर्शन करावे व नियमित ब्लॉग लिहावेत.

पुढे वाचा, एनडीएचे संयोजक शरद यादव काय म्हणतात... क्लिक करा...