आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार करा, मांझींची लालूंना अट, पंतप्रधान मोदींची घेतली भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीची राजकीय पक्षांनी जोरदार तयारी चालवली असताना गुरुवारी माजी मुख्यमंत्री जितराम मांझी यांनी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने राज्यातील राजकीय पक्षांत खळबळ माजली. दरम्यान, लालूंना आपले पाठबळ हवे असेल तर त्यांनी आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करावे, असे आवाहन माझींनी केले असून जिथे नीतीश असतील त्या आघाडीत आपण कदापिही जाणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली.

पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर मांझी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मी बिहारमधील शेतकऱ्यांची कशी दयनीय अवस्था झाली आहे याी माहिती देण्यासाठी मोदींची भेट घेतली. धान्य खरेदीत होत असलेल्या घोटाळ्यांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी आपण या भेटीत केल्याचेही ते म्हणाले.

लालू-नीतीश युती अशक्य
आगामी विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये लालूप्रसाद यादव व नीतीशकुमार यांची युती अशक्य असल्याचे मांझी म्हणाले. या नेत्यांनी युती केली तरी राष्ट्री जनता दलाचे मतदार या युतीला मान्यता देणार नाहीत, असे त्यांनी नमूद केले. निवडणुकीनंतरच्या संभाव्य आघाडीबाबत बोलताना मांझी यांनी ज्या आघाडीत नीतीश नसतील त्या आघाडीला पाठिंबा देऊ, असे सांगून एकप्रकारे भाजपशी आघाडीचेच संकेत दिले.

भाजप, राजद : दोघांचे लक्ष अवाम मोर्चावर
मुख्यमंत्रिपद व जनता दलातून हकालपट्टी झाल्यानंतर मांझी यांनी हिंदुस्थान अवाम मोर्चा नावाने पक्ष स्थापन केला आहे. या पक्षाने भाजपविरोधी महाआघाडीत सहभागी व्हावे, असे आवाहन लालूंनी या पक्षाला केले ओह. शिवाय, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही मांझी यांनी निमंत्रित केले असून नीतीश नसतील त्या आघाडीला आपण पाठिंबा देऊ, असे मांझी यांनी स्पष्टपणे बजावले आहे.
बातम्या आणखी आहेत...