आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्जिकल स्ट्राइकचा बदला घेण्यासाठी जैश.. भारतीय संसदेवर हल्ल्याच्या तयारीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर पाकव्याप्त काश्मिरात भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा बदला घेण्यासाठी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद भारतीय संसंदेवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर संस्थांना मिळाली आहे. जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर पुन्हा एकदा संसदेवर हल्ला करण्याच्या विचारात असल्याचे यामुळे समोर आले आहे.

या माहितीच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर संस्थांनी जम्मू काश्मिरमध्ये सीआयडीला सावध केले असून दहशतवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जर संसदेवर हल्ला करणे शक्य झाले नाही तर दहशतवाद्यांना दिल्ली सचिवालय, अक्षरधाम मंदिर आणि लोटस टेम्पल अशा दिल्लीतील इतर गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.

2001 मध्ये अफजर गुरूने संसदेवर हल्ला घडवून आणला होता. त्याला फेब्रुवारी 2013 मध्ये फासावर लटकावण्यात आले होते. दरम्यान इंटरपोलने भारताच्या एअर फोर्स बेसवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर आणि त्याचा भाऊ अब्दुल रऊफ यांच्या विरोधात आधीच रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे.
पुढे वाचा, पाकिस्तानने वाढवली दहशतवाद्यांची सुरक्षा..
बातम्या आणखी आहेत...