आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजच्या सौंदर्याने अमेरिकेच्या सेकंड लेडी थक्क

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग्रा- अमेरिकेचे उपाध्यक्ष जो बायडेन मंगळवारी आपल्या औपचारिक भेटीगाठींमध्ये मग्न असताना त्यांची पत्नी जिल, मुलगी अ‍ॅशली आणि जावई डॉ. हॉवर्ड डेव्हिड क्रिन यांनी दिल्ली, आग्रा येथे फेरफटका मारला. ताजमहाल पाहून तर बायडेन बाई मंत्रमुग्ध झाल्या. ताजचे सौंदर्य पाहून थक्क झालेल्या जिल यांनी त्याच्या संगमरवरी भिंतींना प्रत्यक्ष हात लावून आपले कुतूहल शमवले.

ताजमहाल परिसरात प्रवेश करताच प्रेमाचे प्रतीक असलेली भव्य संगमरवरी वास्तू पाहून त्या क्षणभर जागीच थबकल्या. त्यानंतर सुमारे 40 मिनिटे त्यांनी त्या ठिकाणी घालवली. ताजचा प्रत्येक कोपरा न्याहाळला. त्यांना शमसुद्दीन खान आणि वरुण रावत या दोन गाइड्सनी ताजमहालाची तपशीलवार माहिती दिली. हे सर्वच अद्भुत आश्चर्यकारक आहे. ताज पाहण्यासाठी तीन तास प्रवास केला तो सार्थकी लागला, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. ताज पाहण्यासाठी त्यांनी पुन्हा भारताला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली.