नवी दिल्ली - अमेरिकेची महिला फोटोग्राफर जिल पीटर्सने भारतीय किन्नरांचे अर्थात तृतीयपंथीचे आकर्षक फोटोज् क्लिक केले आहेत. त्यासोबतच जिलने यांना या अवस्थेत का राहावे लागते हे देखिल स्पष्ट केले आहे. ती म्हणते, 'भारतीय समाजात हिजड्यांची कधीकाळी पुजा केली जात होती, मात्र आता त्यांना भीक मागावी लागते आणि वेश्यावृत्ती देखील करण्याची वेळ त्यांच्यावर येते.
तृतीयपंथींपासून दूर राहाण्याचा दिला होता सल्ला..
जिल पीटर्स भारतात आल्यानंतर दिल्लीत तिच्या नजरेस हिजडे पडले. तेव्हा तिला त्यांच्यापासून चार हात लांब राहाण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र इथेच तिची उत्सूकता वाढली. जेव्हा जिल मुंबईत आली तेव्हा तिला पुन्हा किन्नर दिसले. यावेळी तिने त्यांच्याशी बोलण्याचे पक्के केले होते, तिने गल्लीत फिरत असलेल्या एका किन्नरला फोटो घेण्यासाठी तयार केले.
हिजड्यांना महिलेच्या रुपात फोकस करुन केले फोटोशूट
निर्वाण 'द थर्ड जेंडर ऑफ इंडिया' नावाने फोटो सीरिज शुट करताना पीटर्सला हिजड्यांबद्दल अधिक कळत गेले. त्यांचे हे आयुष्य गॉड गिफ्ट आहे, त्यांना भारतात कसे वागवले जाते, हे तिला जवळून पाहाता आले. यातून तिने तिचे स्वतःचे काही निरीक्षण मांडले. या फोटो सीरिजमध्ये पीटर्सने हिजड्यांना महिलांच्या रुपात फोकस केले आहे. तिने तिच्या वेबसाइटवर याबद्दल लिहिले आहे, हे लोक मेल क्रॉस ड्रेसर्स असतात. ते जन्मतः उभयलिंगी असतात.
त्यांचे आशीर्वाद चालतात मग हालाखित का आहे किन्नर ?
किन्नरांच्या फोटोशूट दरम्यान जिलला त्यांच्याबद्दल बरीच माहिती मिळाली. तिने त्यांच्या अवस्थेबद्दल काही प्रश्न उपस्थित केले, भारतात हिजड्यांचे आशीर्वाद फळाला येतात अशी मान्यता आहे. जेव्हा घरात लग्न कार्य किंवा बाळ जन्माला आले तेव्हा हिजड्यांचे नाच-गाणे पवित्र मानले जाते, यातून संतती प्राप्तीचाही आशीर्वाद लाभतो अशी मान्यता आहे, मग समाज त्यांच्यापासून चार हात अंतर ठेवून का राहातो ? पीटर्सने म्हटले आहे, सर्वसाधारणपणे ते बेरोजगार असतात, त्यामुळे दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्यांना भीक मागावी लागते आणि वेश्यावृत्तीचाही आसरा त्यांना घ्यावा लागतो.
पुढील स्लाइड्समध्ये पाहा, अमेरिकन महिला फोटोग्राफरने क्लिक केलेले किन्नरांचे फोटोज्..