आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jinnah Had Assured Safety And Security Of Non Muslims In Pakistan

पाकिस्‍तानात गैरमुस्लिमांचेही संरक्षण होईलः जिन्‍नांनी \'त्‍या\'वेळी दिले होते आश्‍वासन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- पाकिस्‍तानचे नाव घेताच मुस्लिम कट्टरपथीयांची दहशतीचा चेहरा डोळ्यासमोर उभ राहतो. हा देश दहशतवादी बनविण्‍याचा कारखानाच बनला आहे. स्‍वतंत्र मुस्लिम देशाचा आग्रह धरून मोहम्‍मद अली जिन्‍ना यांनी पाकिस्‍तानची निर्मिती केली. परंतु, स्‍वतः जिन्‍ना यांनी स्‍वातंत्र्यादिनाला केवळ मुस्लिमच नव्‍हे तर सर्व धर्मांच्‍या नागरिकांचे कल्‍याण आणि हितांचे संरक्षण करण्‍याचे आश्‍वासन दिले होते. पाकिस्‍तानात गैरमुस्लिमांची काळजी घेण्‍यात येईल, असे त्‍यांनी 14 ऑगस्‍ट 1947 रोजी केलेल्‍या भाषणात म्‍हटले होते. परंतु, हे भाषण प्रसारितच झाले नाही. ऑल इंडिया रेडिओने त्‍यावेळेस हे भाषण कराची येथे रेकॉर्ड केले होते. आरटीआय कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांच्‍या अर्जाला उत्तर देऊन ऑल इंडिया रेडिओने हे भाषण सार्वजनिक केले आहे.

काय म्‍हणाले होते जिन्‍ना 14 ऑगस्‍ट 1947 रोजी? वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...