आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईशा अंबानीने केले ट्वीट, Jio दिवाळीला सुरू करणार ही सेवा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - जिओ 4G फोन लॉन्च केल्यानंतर आता कंपनी दिवाळी निमित्त आपल्या ग्राहकांसाठी नवी भेट घेऊन येत आहे. मुकेश अंबानी यांच्या कन्या आणि कंपनी बोर्ड संचालक ईशा अंबानीने गुरुवारी एक ट्वीट केले आहे. त्यामध्येच नव्या प्लॅनची घोषणा करण्यात आली आहे. 
 

जिओ होम ब्रॉडबॅन्ड सर्विस JioFiber लॉन्च करणार आहे. यात ग्राहकांना 500 रुपयांत 100GB डेटा मिळणार आहे. यात इंटरनेट स्पीड चक्क 1 जीबीपीएस राहणार आहे. आपल्या ट्वीटमध्ये ईशाने लिहिले, की "Reliance Jio Fiber to offer 100GB data for Rs 500 in 100 cities by Diwali and speed 1Gbps."
 
 
यापूर्वी दिवाळीच्या जवळपास जिओ आपली होम ब्रॉडबॅन्ड इटरनेट सेवा सुरू करणार अशी चर्चा होती. त्यास ईशा अंबानी यांनी अधिकृत दुजोरा दिला आहे. Jio 4G सेवा आल्याने बाजारात 4G मोबाईल सेवा क्षेत्रात प्राईस वॉर सुरू झाली. आता ब्रॉडबॅन्डच्या जगतात सुद्धा जिओ नवी क्रांती घडवणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. 
बातम्या आणखी आहेत...