आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट पदवी : Ladies कोचमधून माजी कायदेमंत्री तोमर यांना घेऊन गेले पोलिस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ - बनावट पदवी प्रकरणी अटकेत असेलेले दिल्लीचे माजी कायदेमंत्री जितेंद्रसिंह तोमर यांना घेऊन दिल्ली पोलिस बुधवारी सकाळी लखनऊला पोहोचले. लखनऊहून फैजाबादला जाण्यासाठी पोलिसांनी तोमर यांना फरक्का एक्सप्रेसच्या लेडीज कोचमध्ये बसवले. फैजाबादच्या अवध युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्या पदवी आणि कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. तोमर यांना मंगळवारी अटक करण्यात आली होती. कोर्टाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर तोमर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

लेडीज कोचमध्ये बसवल्याने प्रवासी नाराज
तोमर यांना लेडीज कोचमधून नेण्यास प्रवाशांनी विरोध केला. लेडीज कोचमध्ये पुरुषांनी प्रवास केल्यास त्यांना 1000 रुपयांचा दंड ठोठावला जातो. मात्र मंत्र्यांना आरामात लेडीज कोचमधून नेले जात असल्याची तक्रार प्रवाशांनी केली.

मोदी सरकारवर कट रचल्याचा आरोप
लखनऊ स्टेशनवर तोमर यांनी मोदी सरकारवर त्यांच्या विरोधात कट रचल्याचा आरोप केला. ते म्हणाले, 'केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिस मिळून त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच दिल्ली सरकार केंद्राला काम करू देत नसल्याचेही ते म्हणाले आहेत.

भागलपूर, मुंगेर आणि बुंदेलखंडलाही नेले जाण्याची शक्यता
फैजाबादमध्ये तोमवर यांना तीन ठिकाणी नेले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यात अवध विद्यापीठ, साकेत कॉलेज आणि त्यांच्या वडिलोपार्जित घराचा समावेश होता. पण अनेक वर्षांपूर्वी ते घर विकून फैजाबादला शिफ्ट झाले होते. तसेच पोलिस त्यांना भागलपूर, मुंगेर आणि बुंदेलखंडलाही घेऊन जाऊ शकतात. यापूर्वी 25 मे रोजी हौजखास पोलिसांच्या एका पथकाने फैजाबादला जाऊन अवध विद्यापीठ आणि साकेत कॉलेजमध्ये जाऊन जितेंद्र सिंह तोमर यांच्या बनावट पदवी आणि प्रमाणपत्राबाबत चौकशी केली होती. विद्यापीठ आणि कॉलेजमधून दिल्ली पोलिसांच्या टीमला तोमर यांची पदवी बनावट असल्याचे सांगण्यात आले होते. त्याच आधारावर त्यांना अटक करण्यात आली होती. तोमर सध्या पोलिस कोठडीत आहेत.
पुढील स्लाइडवर तोमर यांच्यावरील आरोप आणि त्यांच्यावर लावण्यात आलेली कलमे...
बातम्या आणखी आहेत...