आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jitendra Singh Tomar Taken To Lucknow Fake LLB Marksheet Case

बनावट पदवी: तोमर यांची चार तास चौकशी, मोठ्या रॅकेटचा पोलिसांना संशय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी माजी कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर यांच्या बनावट पदवी प्रकरणात मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी लवकरच इतरांनाही अटक केली जाईल, अशी माहिती पोलिस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी दिली. पोलिसांनी बुधवारी तोमर यांना फैजाबादला नेऊन राममनोहर लोहिया अवध विद्यापीठात जवळपास चार तास चौकशी केली. त्यानंतर विद्यापीठातील परीक्षेशी संबंधित तीन वर्षांची कागदपत्रे पोलिसांनी सोबत नेली.
सूत्रांनुसार, या कागदपत्रांद्वारे बनावट पदवी रॅकेटपर्यंत पोहोचण्याची पोलिसांची इच्छा आहे. आपण १९८८ मध्ये अवध विद्यापीठातून बी. एस्सी. केले आणि २०११ मध्ये पदवी प्रमाणपत्र घेतले. पण पोलिसांनी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांसमोर तोमर यांना आणल्यावर ते कुठलाही ठोस युक्तिवाद करू शकले नाहीत. विद्यापीठाचे प्रवक्ता यू. एन. शुक्ल यांनी तोमर यांचा दावा फेटाळला. ते म्हणाले, विद्यापीठात तोमर यांच्या पदवीशी संबंधित कुठलीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत. दरम्यान, तोमर यांनी आपल्या अटकेला दिल्लीच्या सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी होईल.

कपिल मिश्रा नवे कायदामंत्री : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कपिल मिश्रा यांची नवे कायदामंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.