आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्वेषपूर्ण भाषणांचे परिणाम भोगावे लागतात, कंसास फायरिंगवर बोलली हॅरी पॉटरची लेखिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेके रोलिंग म्हणाल्या की द्वेषपूर्ण भाषणांचे परिणाम भोगावे लागतात. - Divya Marathi
जेके रोलिंग म्हणाल्या की द्वेषपूर्ण भाषणांचे परिणाम भोगावे लागतात.
नवी दिल्ली - अमेरिकेतील कंसास येथे  वंशवादातून एका भारतीयाचा खून झाला आहे. त्याचा जगभरातून विरोध होत आहे. अमेरिकन मीडियाने आधीपासूनच त्याचा विरोध केला आहे. आता हॅरी पॉटर सीरिजची लेखिक जेके रोलिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले आहे. त्या म्हणाल्या, 'एकमेकांचा द्वेष करायला लावणारी भाषणे लोक एवढी गांभीर्याने का घेत आहे? विनोद म्हणून ती सोडून दिली पाहिजे. अशा प्रकारच्या भाषेचे परिणाम भोगावे लागतात.' भारतीय लेखक आनंद गिरिधरदास यांच्या ट्विटला उत्तर देताना रोलिंग यांनी हे वक्तव्य केले आहे.  
 
डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती झाल्यानंतर अमेरिकेत सुरू झालेल्या वांशिक हिंसाचारात पहिल्यांदाच भारतीयाचा बळी गेला. बुधवारी रात्री कनसास शहरात एका निवृत्त अमेरिकी नौदल सैनिकाने हैदराबादचे अभियंता श्रीनिवास कुचिभोटला (32) आणि त्यांच्या मित्रावर गोळ्या झाडल्या. माझ्या देशातून चालते व्हा असे सांगत हल्लेखोर अॅडम पिरंटोनने दोघांवर गोळ्या झाडल्या. भारतीयांच्या समर्थनार्थ बोलणारा 24 वर्षीय अमेरिकी ईयान ग्रिलोटवरही गोळ्या झाडून पिरंटोनने त्याला जखमी केले. 
 
भारतीयांना वाचवण्याचा प्रयत्न करणारा ईयान ग्रिलोट हा 24 वर्षीय अमेरिकी जगाच्या नजरेत हीरो बनला. त्याचा हात डोक्यात गोळी लागली आहे. तो म्हणाला, त्या वेळी कुणीही जे केले असते, तेच मी केले आहे. तो कोण आहे किंवा त्याचा वंश कोणता, हे महत्त्वाचे नाही. 
 
पुढील स्लाइडमध्ये, पाहा हत्या झालेला भारतीय इंजिनिअर आणि त्याची पत्नी काय म्हणाली... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...