आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

JNU: देशविरोधी नारेबाजीतील दोन काश्मीरी विद्यार्थी 10 दिवसांपासून बेपत्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेएनयूमध्ये 9 फेब्रुवारीला झालेल्या कार्यक्रमात देशविरोधी घोषणाबाजी झाल्याचा आरोप आहे. - Divya Marathi
जेएनयूमध्ये 9 फेब्रुवारीला झालेल्या कार्यक्रमात देशविरोधी घोषणाबाजी झाल्याचा आरोप आहे.
नवी दिल्ली - जेएनयूमध्ये देशविरोधी नारेबाजी करणाऱ्या कॅम्पसबाहेरील विद्यार्थ्यांमध्ये दोन काश्मीरचे होतो. घोषणाबाजीची चौकशी करणाऱ्या समितीच्या अहवालात याचा उल्लेख आहे. 10 फेब्रुवारीनंतर ते कॅम्पसमधून गायब झाले.

चौकशी समितीच्या अहवालात मुजीब आणि कादिरचे नाव
- पाच सदस्यांच्या समितीने दिलेला अहवाल 11 मार्चला कुलगुरुंना देण्यात आला होता.
- अहवालात ज्या दोन काश्मीरी विद्यार्थ्यांचा उल्लेख आहे. त्यांचे नाव मुजीब गट्टू आणि मोहम्मद कादिर आहे.
- गट्टू कावेरी होस्टेलच्या रुम नंबर 137 मध्ये राहात होता. तो अनंतनाग येथील रहिवासी आहे.
- कादिर राजोरी जिल्ह्यातील आहे तो लोहित होस्टेलमध्ये रुम नंबर 221मध्ये राहात होता.
देशविरोधी घोषणा दिल्याचे व्हिडिओत कुठेही नाही
- 9 फेब्रुवारी रोजी जेएनयू परिसरात "भारत की बर्बादी तक जंग रहेगी...' अशा घोषणा दिल्याचे उपलब्ध व्हिडिओ फुटेजमध्ये कुठेही आढळत नसल्याचे अहवालात म्हटले आहे.
- अहवाल सांगतो की, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या साक्षीमध्ये मात्र अशा घोषणा आपण परिसरात ऐकल्याचे नमूद केले आहे. "भारत के टुकडे टुकडे कर दो...' अशा घोषणा दिल्या गेल्याचा उल्लेख या चौकशी अहवालात कुठेही नाही.
- विद्यापीठातील प्रोफेसर राकेश भटनागर यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय समितीने चौकशीअंती हा अहवाल तयार केला आहे.
- बाहेरच्या लोकांना या विद्यापीठाच्या आवारात येऊन भडक घोषणा देण्याची परवानगी कशी मिळाली, ही बाब अनाकलनीय असल्याचे अहवालात म्हटले आहे.
- याचा ठपका समितीने विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्थेवर ठेवला आहे.
- "त्या' कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उमर खालिद अाग्रही होता. कोणत्याही परिस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल, असा इशारा देत सुरक्षा रक्षकांनी काय कारवाई करायची ती करावी, असेही खालिद याने बजावले होते, अशी अहवालात नोंद आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय दिल्या होत्या घोषणा
बातम्या आणखी आहेत...