आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंध विद्यार्थ्यांसाठी जेएनयू उभारणार ई-रिसोर्स सेंटर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जगभरातील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अंध विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शैक्षणिक साहित्य पोहोचावे, यासाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) ऑनलाइन पोर्टल विकसित करणार आहे. त्यासाठी नॅशनल रिसोर्स सेंटरची स्थापना केली जाणार आहे. या रिसाेर्स सेंटरच्या माध्यमातून दृष्टिहीन विद्यार्थ्यांना जगभरातील ज्ञानभांडार खुले होणार असून शोधप्रबंध तयार करण्यासाठी मदत होणार आहे. या प्रकल्पासाठी जेएनयू प्रशासन अध्यापक ग्रंथालय उभारण्याचे नियोजन करत आहे.
एमएचआरडी, सामाजिक न्याय आदी मंत्रालयांत सादर करण्याकरिता प्रस्तावही तयार केला जात आहे. विद्यापीठाचे ग्रंथपाल रमेश सी. गौड यांनी सांगितले, दृष्टिहीन विद्यार्थ्यांना सध्या पुरवल्या जाणाऱ्या सुविधा, त्यांच्या गरजा आणि अपेक्षा जाणून घेण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या माध्यमातून देशभरातील मान्यताप्राप्त विद्यापीठांत सर्वेक्षण करण्याची योजना जेएनयूने तयार केली आहे. सर्वेक्षणाअंती विद्यापीठात चर्चासत्रही आयोजित केले जाणार आहे.
ज्ञानाचे दार उघडणार : तांत्रिक अडचणींमुळे अंध विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेण्यात अनेक अडचणी येतात. त्या सोडवण्यासाठी प्रयत्न होत असले तरी ते अपुरे ठरत आहेत. रिसोर्स सेंटरमुळे अंध विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची कवाडे खुली होणार आहेत.