आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • JNU: Court Custody Of Kanhaiya Extended Till 2 March

जेएनयू वाद: कन्हैयाला २ मार्चपर्यंत कोठडी, कडेकोट बंदोबस्तात सुनावणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्हैयाच्या वकिलास (मध्यभागी) संतप्त वकिलांनी पतियाळा हाऊस न्यायालयाबाहेर अशी धक्काबुक्की केली. - Divya Marathi
कन्हैयाच्या वकिलास (मध्यभागी) संतप्त वकिलांनी पतियाळा हाऊस न्यायालयाबाहेर अशी धक्काबुक्की केली.
नवी दिल्ली - देशद्रोहाच्या आरोपावरून अटक करण्यात आलेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैयाकुमार याला २ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. बुधवारची सुनावणी अत्यंत कडेकोट बंदोबस्तात पार पडली. कन्हैयाकुमारची बाजू मांडणारे सहा वकील, जेएनयूचे एक प्राध्यापक आणि पाच पत्रकारांनाच न्यायालयात प्रवेश देण्यात आला होता.

दरम्यान, कन्हैयाला झालेल्या मारहाणीची चौकशी करण्यासाठी गेलेले वकील राजीव धवन यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, ‘पतियाळा हाऊस न्यायालयात मला मारहाण करण्यात आली. मला पाकिस्तानचा दलालही म्हटले गेले.’ अहवालात सहासदस्यीय पथकाने म्हटले आहे की, न्यायालयाच्या परिसरात अनेक अनावश्यक लोक उपस्थित होते. दिल्ली पोलिस कन्हैयाला सुरक्षा देण्यात अपयशी ठरले. त्याच्या जिवाला धोका आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत दिल्ली पोलिसांच्या वकिलाकडे विचारणा केली की, ‘तुम्ही सुरक्षा देऊ शकता की नाही?’ त्यावर पोलिसांनी कन्हैयाला पूर्ण सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले.
कन्हैयाला जामीन शक्य : कन्हैयाने जेएनयूमधील आपल्या सहकाऱ्यांना भारतीय राज्यघटनेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्याने खुले पत्र लिहून देश आणि राज्यघटना यांच्याबद्दल आपली प्रतिबद्धता दर्शवली आहे. त्यानंतर बस्सी म्हणाले की, कन्हैयाने जामिनासाठी अर्ज केला तर आमचा त्यावर आक्षेप नाही.

राहुल गांधींवर गुन्हा : जेएनयूत देशविरोधी घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे समर्थन केल्याबद्दल राहुल गांधी यांच्याविरोधात अलाहाबाद न्यायालयात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने याचिकाकर्ते तथा भाजप नेते सुशील मिश्र यांना राहुल यांच्याविरोधात एक मार्चपर्यंत पुरावे सादर करण्याचे आदेश दिले.

कन्हैयाविरोधात पुरावे
‘तुम्ही एक तर माध्यमांत येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवा किंवा मग तपास करत असलेल्या पोलिसांचे म्हणणे मान्य करा. पोलिसांकडे पुरेसे पुरावे आहेत. आम्ही न्यायालयात पुरावे सादर करू.’ - बी. एस. बस्सी, पोलिस आयुक्त, दिल्ली.

पोलिसांकडून उल्लंघन
‘दिल्ली पोलिस सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे खुलेआम उल्लंघन करत आहे. बस्सी यांची वर्तणूक योग्य नाही. त्यांना एवढा आत्मविश्वास असण्याचे कारण काय? त्यांना वरिष्ठांकडून कोणते निर्देश मिळाले?’
-अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली
पुढे वाचा.. ‘भारत तोडा’ व ‘भारत जोडा’ यात संघर्ष