आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi HC Grants Bail To ​JNUSU President Kanhaiya Kumar

JNU case # कन्‍हैया कुमारला सहा महिन्‍यांचा अंतरिम जामीन मंजूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला आज (बुधवार) दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयाने 10 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सहा महिन्‍यांचा अंतरित जामीन मंजूर केला.
काय म्‍हणाले सरकारी वकील ?
यावर प्रतिक्रिया देताना दिल्ली पोलिसांच्‍या वकिलाने म्‍हटले, न्‍यायालयाचा हा निर्णय आमच्‍यासाठी झटका नाही. तो संतुलित असून, चौकशीदरम्‍यान कन्‍हैयाला पोलिसांना सहकार्य करावे लागणार आहेत.
कन्हैया उद्या येणार जेलमधून बाहेर ?
न्‍यायालयाचा आदेश तिहार तरुंग प्रशासनाकडे पोहोचेपर्यंत रात्र होऊ शकते. त्‍यामुळे देशद्रोहाच्‍या आरोपात अटकेत असलेला कन्‍हैयाकुमार हा उद्या (गुरुवारी) सकाळी तरुंगातून बाहेर येऊ शकतो.
काय आहे दिल्‍ली पोलिसांच्‍या अहवालात
कन्‍हैयाकुमार आणि त्‍याच्‍या सहकाऱ्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल झाला असून, विद्यापीठातील आंदोलनादरम्यान त्‍याने देशविरोधात 29 घोषणा दिल्‍याचे दिल्‍ली पोलिसांनी न्‍यायालयात सादर केलेल्‍या अहवालात म्‍हटले आहे. मात्र, यामध्‍ये 'पाकिस्तान जिंदाबाद‘ या घोषणेचा मात्र समावेश नाही. जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असलेले उमर खालीद व अनिर्बन भट्टाचार्य हे आज दिल्ली पोलिसांना शरण आलेले आहेत.