आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RSSच्या मुखपत्रातून आरोप, JNU देशविरोधी कारवायांचा अड्डा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठाला (जेएनयू) देशविरोधी लोकांचा अड्डा संबोधले आहे. संघाचे नियतकालिक पंचजन्य मधील 'दरार का गढ' लेखात जेएनयू नक्षलवाद्यांचे केंद्र असल्याचे म्हटले आहे. पंचजन्यतील लेखानूसार, 'जेएनयूमधील एक मोठा गट देशविरोधी लॉबी तयार करत आहे. हे काम देशाचे तुकडे करणारे आहे.'
पंचजन्यने जेएनयूवर का केले आरोप ?
> पंचजन्यनूसार, जेएनयूमधील विद्यार्थी संघटना नक्षल समर्थक आहेत. 2010 मध्ये छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलींनी सीआरपीएफच्या 75 जवानांना मारले होते तेव्हा जेएनयूमध्ये दिवसाढवळ्या आनंदोत्सव साजरा केला होता. हे सर्व जेएनयू प्रशासनाच्या नाकाखाली झाले होते.
> येथे लोकांचे धर्मपरिवर्तन करण्याचे उद्योग सुरु आहेत. राष्ट्रीय प्रतिके आणि चिन्हांचा अपमान केला जातो. एका पोस्टरमध्ये अशोकचक्राला बुटाच्या खाली दाखवले होते.
> जेव्हा संपूर्ण देशात दुर्गा देवीची पूजा होते तेव्हा येथील डावे आणि ख्रिश्चन विद्यार्थी व प्राध्यापक 'महिषासूर दिवस' साजरा करतात.
> 1969 मध्ये स्थापन झालेले जेएनयू शैक्षणिक संस्थांमध्ये सर्वात अव्वल स्थानी आहे, मात्र येथे शिक्षण सोडून इतर गोष्टींचीच अधिक चर्चा होते.
> जेएनयूच्या फुड फेअरमध्ये काश्मिरला एक वेगळा देश असल्याचे दाखवत त्यांचा वेगळा फुट स्टॉल लावला जातो.
> जेव्हा सोव्हिएत संघाचे विघटन झाले तेव्हा जेएनयूसारख्या संस्थामध्ये एक नवा राजकीय विचार पुढे आला. त्यानूसार येथील लोकांनी आपला राजकीय अजेंडा क्लास स्ट्रगल वरुन कास्ट स्ट्रगलकडे बदलला.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, जेएनयूमधील कार्यक्रम राष्ट्रविरोधी असल्याचे संबोधत पंचजन्यमध्ये प्रकाशित झालेले फोटोज् आणि बरेच काही
बातम्या आणखी आहेत...