आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • JNU : Journalists, Teachers Beaten Up In Kanhaiya Kumar Hearing

जेएनयू वाद: कन्हैयाकुमारच्या सुनावणी प्रसंगी पत्रकार,शिक्षकांवर हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमारच्या सुनावणीप्रसंगी सोमवारी पतियाळा हाऊस न्यायालय परिसरात प्रसारमाध्यम प्रतिनिधी, विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर हल्ला करण्यात आला. कुमारला शुक्रवारी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. दिल्ली पत्रकार संघटनेने (डीयूजे) हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हल्ल्यावेळी पोलिस प्रेक्षकाच्या रूपात हा प्रकार पाहत होते, असा आरोप डीयूजेने केला आहे. महिला पत्रकारांवरही हल्ला करण्यात आला. वार्तांकन करताना पोलिसांनी पत्रकारांना संरक्षण द्यावे. या घटनेत सहभागी व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. वकिलांचा एक गट एका व्यक्तीला मारहाण करत होता. दिल्ली भाजपचे आमदार ओ. पी. शर्मा वकिलांमध्ये सामील झाले हेाते. मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव अमीक जमाई असून त्याला तुघलक रोड पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

वकिलांच्या गटाने प्रथम जेएनयूच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर हल्ला चढवला.जेएनयू राष्ट्रविरोधी तत्त्व व दहशतवाद्यांचा अड्डा असल्याचे सांगत त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. टीव्ही पत्रकार व एका महिला पत्रकारालाही मारहाण करण्यात आली. न्यायालयाबाहेर वकिलांच्या आणखी एका गटाने जेएनयू विद्यार्थी व न्यायालय कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली. आमदार शर्मा यांना मारहाणीतील सहभागाबाबत विचारणा केली तेव्हा ते म्हणाले, पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्यानंतर आपणास मारहाण झाली. ते एका व्यक्तीला मारहाण केल्याची चित्रफीत असल्याचे त्यांना सांगण्यात आले तेव्हा त्यांनी तुम्ही काेणत्या चित्रफितीविषयी बोलता, असे उत्तर दिले. यानंतर त्यांनी अशा घोषणा दिल्या जात असतील तर मारहाणीत गैर नाही, असे शर्मा म्हणाले. या घटनेत एकूण ९ पत्रकारांवर हल्ला झाला. दोन पत्रकारांना आरएमएल रुग्णालयात नेण्यात आले.
पुढे वाचा... १० प्राध्यापकांना मारहाण