आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jnu Kanhaiya Kumar And Others Go On Hunger Strike Against Probe

कन्हैया कुमारसह 25 विद्यार्थ्यांचे उपोषण; शिक्षा ठोठावल्याचा विरोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने सुनावलेल्या शिक्षेचा विरोध करत येथील २५ विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५ आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमारसह अन्य गटाच्या २० जणांचा समावेश आहे. यापूर्वी बुधवारी रात्री उशिरा विद्यार्थ्यांनी जेएनयूच्या प्रशासकीय इमारतीपर्यंत मशाल मोर्चा काढून या शिक्षेला विरोध केला होता.

संसदेवरील हल्ल्यातील दहशतवादी अफझल गुरूच्या मृत्युदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रविरोधी घोषणा दिल्याचा आरोप या विद्यार्थ्यांवर अाहे. जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारने या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर म्हटले की, विद्यापीठ प्रशासनाने ऐन परीक्षेच्या काळात शिक्षा सुनावल्यामुळे आम्ही शांत बसणार नाही. याचा विरोध करू आणि सोबतच शिक्षणही पूर्ण करू. रोहित वेमुलाच्या आत्महत्येलाही अशाच प्रकारचा "हायलेव्हल ड्रामा' कारणीभूत होता. परंतु, आम्ही मरणार नाही, तर परिस्थितीशी लढा देऊ. दरम्यान, या प्रकरणाची तक्रार करणारा सौरभ कुमार याला दंड लावल्याच्या विरोधात अभाविपचे सदस्यही उपोषण करत आहेत. वाहतूक अडवल्याचा आरोप करत सौरभवर १० हजारांचा दंड लावण्यात आला आहे.

दिल्ली पोलिस, "आप' च्या वकिलांत हमरीतुमरी : कन्हैया कुमारला देण्यात आलेल्या अंतरिम जामीनप्रकरणी बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात आम आदमी पक्षाचे वकील आणि दिल्ली पोलिसांच्या वकिलांत हमरीतुमरी झाली. नियमांचे उल्लंघन करून कन्हैयाला जामीन दिल्यामुळे त्याचा जामीन रद्द करावा, अशी दिल्ली पोलिसांची मागणी आहे.