आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • #JNU Row : SC Refuses To Hear Kanhaiya Kumar Bail Plea

HC मध्‍येही कन्हैयाच्‍या आर्जावर सुनवाई नाही; गिलानींचा जामीन फेटाळला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जेएनयूमध्‍ये देश विरोधी नारेबाजी केल्‍याप्रकरणी देशद्रोहाच्‍या आरोपाखाली अटकेत असलेल्‍या कन्‍हैया कुमार याला दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयाकडूनही दिलासा मिळाला नाही. दरम्‍यान, यापूर्वी सर्वोच्‍च न्‍यायालयाने त्‍याच्‍या जामीन अर्जावर सुनावनी करण्‍यास नकार दिला होता. तसेच अफजल गुरूशी संबंधित कार्यक्रमाचे आयोजन केल्‍या प्रकरणी अटकेत असलेले डीयूचे माजी प्राध्‍यापक एसएआर गिलानी यांचा जामीन अर्ज पटियाळा कोर्टाने फेटाळला.
वाकिलांनी काढला मोर्चा
जवाहरलाल नेहरू विद्यालयात देश विरोधी नारे देणाऱ्यांच्‍या विरोधात शुक्रवारी वाकिलांनी मोर्चा काढला. हा मोर्चा पटियाळा हाउस कोर्ट परिसरातून निघाला. इंडिया गेटवर त्‍याचा समोरोप झाला. दोन दिवसांपूर्वी वकिलांना कोर्टात गोधंळ घालून पत्रकारांसह विद्यार्थ्‍यांना मारहाण केली होती.
कन्हैयाच्‍या जामीन अर्जावर सुनावणी करण्‍यास सु‍प्रीम कोर्टाचा नकार
तिहार तुरुंगात जीविताला धोका आहे. त्‍यामुळे आपल्‍याला जामीन मिळावा, असा अर्ज जेएनयूतील (जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी) विद्यार्थी नेता कन्हैया कुमारने सर्वोच्च न्यायालयात केला होता. मात्र, त्‍यावर सुनावणी करण्‍यात सर्वोच्‍च न्‍यायालयाने नकार दिला. शिवाय अशा प्रकारच्‍या अर्जावर सर्वोच्‍च न्‍यायालयाने सुनावनी केली तर देशाभरातून अर्जाचा पूर येईल, अशी टिप्‍पणी करत कन्हैय्या याने उच्‍च न्‍यायालयात दाद मागावी, असे म्‍हटले.

सर्वोच्‍च न्‍यायालयात काय झाले ...
- या प्रकरणी दिल्‍ली पोलिसांनी आपला अहवाल सादर केला.
- राजू रामचंद्रन यांनी कन्हैयाकडून युक्‍तीवाद केला. त्‍यांनी म्‍हटले, पटियाळा हाउस कोर्टामध्‍ये कन्‍हैयाच्‍या जीवित्‍वास धोका आहे त्‍यामुळे आम्‍ही सर्वोच्‍च न्‍यायालयात दाद मागितली आहे.
- त्‍यावर सर्वोच्‍च न्‍यायालयाने म्‍हटले, पटियाळा हाउसची परिस्‍थिती पाहाता तुम्‍ही उच्‍च न्‍यायालयात दाद मागा.
- शिवाय दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयामध्‍ये कन्हैया आणि इतर विद्यार्थी संघटनेच्‍या सुरक्षेची चोख व्‍यवस्‍था ठेवावी आणि या याचिकेवर त्‍वरित सुनावनी करावी, असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले.
पुढील स्‍लाइडवर वाचा, आता पुढे काय होणार ?