आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JNU : बेपत्ता नजीबच्या शोधासाठी विशेष तपास पथक स्थापन, कोंडलेल्या कुलगुरूंची मुक्तता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी दुपरापासून विद्यार्थ्यांनी प्रशासकीय इमारतीला घेराव घालून कुलगुरुंसह अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांना बंदिस्त करुन ठेवले आहे. - Divya Marathi
बुधवारी दुपरापासून विद्यार्थ्यांनी प्रशासकीय इमारतीला घेराव घालून कुलगुरुंसह अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांना बंदिस्त करुन ठेवले आहे.
नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) बेपत्ता विद्यार्थी नजीब अहमद याचा शोध घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्ली पोलिसांना विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश गुरुवारी दिले. दरम्यान, संतप्त विद्यार्थ्यांनी २० तास घेराव घातल्यानंतर कुलगुरू आणि इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कार्यालयाबाहेर पडता आले.

वसतिगृहात अभाविपच्या समर्थकांसोबत वाद झाल्यानंतर शनिवारपासून नजीब गायब आहे. त्याच्या शोधासाठी जेएनयूचे प्रशासन पुरेशा हालचाली करत नाही असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. विद्यार्थ्यांनी सांगितले की, आम्ही आमची भूमिका सौम्य केली नाही. फक्त अकॅडमिक कौन्सिलच्या पूर्वनियोजित बैठकीत भाग घेता यावा म्हणून कुलगुरू एम. जगदीशकुमार आणि इतरांना कार्यालयाबाहेर जाऊ देण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यांना बुधवारी दुपारपासून कार्यालयातच कोंडून ठेवले होते. जेएनयूमधील शिक्षक संघटना विविध मुद्द्यांवर विद्यार्थ्यांना पाठिंबा देते. मात्र, कुलगुरू आणि इतरांना कोंडून ठेवल्याब्ददल संघटनेने विद्यार्थ्यांवर टीका केली आहे.

कुलुगुरूंचा इशारा
कोंडून ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा कुलगुरूंनी गुरुवारी सकाळी दिला. नजीबला शोधण्यासाठी प्रशासन प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे, हे समजावण्यासाठी विद्यार्थ्यांशी चर्चा केली .पण विद्यार्थी बेकायदेशीर कारवाया करत आहेत. अशा अवैध प्रकारांना आम्ही भीक घालू शकत नाही, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले. प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही, हा आरोप त्यांनी फेटाळून लावला. चौकशीला गती दिली जाईल आणि दोषींना शिक्षा होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पुढे पाहा, संबंधित PHOTOS
बातम्या आणखी आहेत...