आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेएनयू वाद : विद्यार्थी देणार नाही नोटीशीचे उत्तर, विद्यार्थी परिषदेत प्रस्ताव मंजूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जेएनयूचे आरोपी विद्यार्थी विद्यापीठाकडून जारी करण्यात आलेल्या नोटीशीला उत्तर देणार नाहीत. विद्यापीठाच्या ५ सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे नोटीस जारी करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या मते, आमचा गुन्हा जोपर्यंत सांगणार नाहीत तोपर्यंत नोटीसचे उत्तर देणार नाही. या संदर्भांत विद्यार्थी परिषदेने बुधवारी रात्री एक बैठक आयोजित केली होती. त्यात नोटीशीला उत्तर न देण्याचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला. जेएनयू विद्यार्थी संघटनेची उपाध्यक्षा शेहला राशिदच्या मते, चौकशी समितीने प्रक्रियेदरम्यान कायदेशीर बाबींचे पालन केले नाही. समितीने चौकशीअंती दोषी विद्यार्थ्यांना १४ मार्च रोजी कारणे दाखवा नोटीस जारी केले होते आणि त्यांच्याकडून १८ मार्चपर्यंत उत्तर मागवले होते.

अहवालात नाव नाही, तरीही निलंबन

अफजल गुरूच्या मृत्यूदिनी आयोजित कार्यक्रमाच्या संदर्भांत जेएनयूतील ऐश्वर्या अधिकारी या विद्यार्थीनीला निलंबित करण्यात आले. मात्र, विद्यापीठाच्या उच्चस्तरीय चौकशी समितीच्या अहवालात तिचे नाव नाही.

अभाविपवरही अहवालात ताशेरे
जेएनयूच्या चौकशी समितीने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. हा अहवाल समझोत्याने झाला असल्याचा संघटनेचा आरोप आहे. ९ फेब्रुवारीच्या कार्यक्रमात सामिल लोकांना दोषी सिद्ध करण्यात समितीला अपयश आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

कन्हैय्याच्या जामीनावर २३ ला निकाल
दिल्ली उच्च् न्यायालयाने जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारचा अंतरिम जामिन रद्द करण्यासंदर्भातील याचिकांवर २३ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.