आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • JNU: Today Hearing Of Beating Case In Supreme Court

जेएनयू वाद : न्यायालय परिसरात मारहाण प्रकरणाची सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्हैयाकुमारची सुटका करावी या मागणीसाठी जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारीही विद्यापीठ परिसरात निदर्शने केली. - Divya Marathi
कन्हैयाकुमारची सुटका करावी या मागणीसाठी जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारीही विद्यापीठ परिसरात निदर्शने केली.
नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैयाकुमार याला पतियाळा हाऊस न्यायालयात हजर करताना पत्रकार तसेच जेएनयूचे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना झालेल्या मारहाण प्रकरणाची उद्या, बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची तत्काळ सुनावणी करण्यास न्यायालयाने मंगळवारी सहमती दर्शवली.

सोमवारच्या मारहाणीत जखमी झालेला जेएनयूचा माजी विद्यार्थी एन. डी. जयप्रकाश याने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. मारहाणीसाठी जबाबदार असणाऱ्यांवर तसेच काहीही कारवाई न करणाऱ्या दिल्ली पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या हिंसाचारात कन्हैयाकुमारच्या जीवाला धोका होता. एवढेच नव्हे, तर पत्रकारांनाही त्यांचे काम करण्यापासून रोखण्यात आले, असे याचिकेत म्हटले आहे.

दुसरीकडे, जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याच्या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेमार्फत (एनआयए) करावी, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. दिल्ली पोलिसांनी यापूर्वीच चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे याचिका स्वीकारता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. यासंदर्भात रंजना अग्निहोत्री यांनी याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांची बाजू मांडताना अॅड. हरिशंकर जैन म्हणाले की, काही विद्यार्थी तसेच नागरिकांनी भारताच्या सार्वभौमत्व आणि एकात्मतेलाच आव्हान दिले आहे. काही विदेशी तत्त्वेही देश अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने म्हटले की, ही घटना ९ फेब्रुवारीची आहे. दिल्ली पोलिस चौकशी करत आहेत. आधी पोलिस चौकशी पूर्ण होऊ द्या. आवश्यकता नसताना सध्या निर्णय देऊ शकत नाही.

पुढे वाचा.. पत्रकार उतरले रस्त्यावर,
बंदमध्ये प्राध्यापकही सहभागी