आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेएनयू : भारतविरोधी घोषणाबाजी झाल्यासंबंधीचे व्हिडिओ फुटेज खरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गेल्या ९ फेब्रुवारीला दहशतवादी अफझल गुरूचा स्मृतिदिन साजरा करत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भारतविरोधी घोषणाबाजी झाल्यासंबंधीचे व्हिडिओ फुटेज खरे असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच आधारे जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैयाकुमारसह इतर दोघांविरुद्ध राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

पोलिसांनुसार, एका हिंदी वाहिनीवरून घेण्यात आलेले हे फुटेज तपासणीसाठी सीबीआयच्या दिल्ली येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. दरम्यान, विशेष पोलिस आयुक्त अरविंद दीप यांनी यासंबंधीचा अहवाल प्राप्त झाला असल्याच्या वृत्ताला दुजोरा देत याबद्दल सविस्तर माहिती देण्यास नकार दिला.या व्हीडिओसोबत कॅमेरा, मेमरी कार्ड, एक सीडी आणि इतर काही उपकरणेही तपासणीसाठी पाठवण्यात आली होती.
बातम्या आणखी आहेत...