आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपोआपच निर्माण होतील नोकर्‍या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ मुंबई - या वेळच्या सार्वत्रिक निवडणुकीत अध्र्याहून अधिक मतदार युवा आहेत. त्यापैकी सात कोटींहून अधिक बेरोजगार आहेत. त्यांना भुरळ पाडण्यासाठी राजकीय पक्ष नोकर्‍या देण्याची अशक्य वाटणारी आश्वासने देत आहेत. काँग्रेसने 10 कोटी नोकर्‍या देण्याचे आश्वासन दिले त्याप्रमाणे भाजप व अन्य पक्षही अशीच आश्वासने देत आहेत. एवढय़ा प्रमाणात नोकर्‍या निर्माण होऊ शकतील या स्थितीत देशाची अर्थव्यवस्था अजिबात नाही. उत्पादन, ऊर्जा, बँकिंगसारख्या काही क्षेत्रात मात्र कोट्यवधी नोकर्‍या निर्माण होतील. स्वत: जागतिक बँकेनेच 2020 पर्यंत 10 कोटी नवीन नोकर्‍या निर्माण होतील असा अंदाज बांधला आहे.