आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्विपक्षीय संबंधांचा नवा अजेंडा तयार करा, अमेरिकन परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांना मोदींची सूचना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. ओबामांनी दिलेले अमेरिका भेटीचे निमंत्रण सोपवताना ते भेटीची आतूरतेने वाट पाहत असल्याचा निरोपही केरी यांनी आवर्जून दिला. त्यावर दोन्ही देशांचे परस्पर संबंध दृढ करण्याचा अजेंडा अमेरिकेने तयार करावा, असा सल्ला मोदींनी दिला.
परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर विविध मुद्यांवर चर्चा झाली. केरी आणि अमेरिकेच्या वाणिज्य मंत्री पेनी प्रिट्जकेर यांनी गुरुवारी झालेल्या भारत - अमेरिका सामरिक चर्चेचा तपशील मोदींना दिला. मोदी सप्टेंबरच्या अखेरच्या सप्ताहात अमेरिका दौर्‍यावर जाणार आहेत. या अनुषंगाने मोदी आणि केरी यांच्यात विविध मुद्यांवर चर्चा झाली.
भारत-अमेरिका संबंध नव्या पातळीवर सुरू व्हावे
केरी यांनी राष्ट्रपती बराक ओबामांनी दिलेले अमेरिका भेटीचे निमंत्रण मोदींना सोपवले. ओबामा तुमच्या भेटीची आतुरतेने वाट पाहात असल्याचा निरोपही त्यांनी दिला. यावर मोदी म्हणाले, ‘भारत - अमेरिका द्विपक्षीय संबंधांची पूर्णपणे नव्या पातळीवर घेऊन जाण्यासाठी ठोस सुरुवात करायला हवी. त्यादृष्टीने अमेरिकेने द्विपक्षीय संबंधांचा नवा अजेंडा तयार करावा.’