नवी दिल्ली - वादग्रस्त विमा विधेयकासह अन्य महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्यासाठी केंद्र सरकारने संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावण्याची तयारी केली आहे. तसे संकेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनीच दिले आहेत. ‘आमचे सरकार महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्यासाठी फारच गरज भासली तर घटनात्मक मार्ग म्हणून संयुक्त अधिवेशन बोलावू शकते’ असे जेटली म्हणाले.
दिल्लीत आयोजित एका आर्थिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी जेटली म्हणाले की, मागील ४-५ दिवसांपासून विरोधी पक्ष केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त विधानावरून संसदेत गोंधळ घालत आहे. गेल्या चार दिवसांपासून राज्यसभेत तर कामकाजच झालेले नाही. लोकसभेत मंजूर विधेयकांवर राज्यसभेचे शिक्कामोर्तब आवश्यक
आहे. परंतु राज्यसभेत रालोआचे बहुमत नसल्यामुळे अडचणी येत आहेत.