आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्याने नंबर ट्विट केला, नंतर पत्रकारास धमकी, चौरसियांच्या पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पोलिसांनी टीव्ही पत्रकार दीपक चौरसिया यांना फोनवर धमकी दिल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा मोबाइल क्रमांक आम आदमी पक्षाचे (आप) मंत्री कपिल मिश्रा यांनी ट्विट करून सार्वजनिक केला होता.

चौरसिया यांची पत्नी अनसूया रॉय यांनी सफदरजंग इनक्लेव्ह ठाण्यात याबाबत तक्रार केली. तक्रारीत म्हटले आहे की, १३-१४ सप्टेंबरच्या रात्री ११ पासून ते पहाटे ४ पर्यंत चौरसिया यांना अज्ञात क्रमांकावरून धमकीचे फोन आले. कपिल मिश्रा यांनी चौरसियांचा नंबर ट्विट केल्यापासून कॉल आणि मेसेज येत आहेत. दीपक चौरसिया यांनी आपल्या वाहिनीवर दिल्लीतील चिकनगुनियाच्या साथीबद्दलचे वृत्त दाखवताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्ली सरकारच्या मंत्र्यांचे क्रमांक स्क्रीनवर दाखवले होते. मंत्री कपिल मिश्रांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, ‘प्रिय दीपक चौरसिया, तुम्ही माझा खासगी क्रमांक दाखवला. आता मीही तुमचा देतो.’
बातम्या आणखी आहेत...