आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकाराला जाळून मारल्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाची UP, केंद्र सरकारला नोटीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहजहांपुर (उत्तर प्रदेश)/नवी दिल्ली - पत्रकार जगेंद्र सिंह यांना जिवंत जाळल्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने UP आणि केंद्र सरकारकडून दोन आठवड्यांत उत्तर मागवले आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या संदर्भातील एका अर्जाच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने ही नोटीस पाठवली आहे. एक जून रोजी पत्रकार जगेंद्र सिंह यांना जिवंत जाळल्याचे प्रकरण समोर आले होते. प्रकरणाचा आरोप उत्तर प्रदेशचे मंत्री राममूर्ती वर्मा यांच्यावर आहे.

आज मुख्यमंत्र्यांना भेटणार
जगेंद्र यांचे कुटुंबीय या प्रकरणी न्याय मिळण्याच्या मागणीसाठी गेल्या आठवडाभरापासून आंदोलन करत आहे. सोमवारी त्यांची पत्नी आणि मुले लखनऊला जाऊन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना भेटू शकतात.

प्राथमिक अहवाल धक्कादायक
या प्रकरणातील न्यायवैद्यक चाचणीचा अहवाल आला आहे. त्यानुसार पत्रकाराच्या शरिरावर असलेल्या जखमा या स्वतः केल्या असल्याचे दिसत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या तपासात जगेंद्र यांच्या कपड्यांची तपासणी करण्यात आली. त्यावर केवळ जगेंद्र यांच्या हाताचे ठसे आढळले आहेत. त्याआधारे प्राथमिक दृष्ट्या जगेंद्र यांनी स्वतःच आग लावली असल्याचे त्यावरून प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट होत असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी आपल्या रिपोर्टमध्ये जगेंद्र यांनीच जाळून घेतल्याची शक्यता वर्तवली होती.

तडजोडीसाठी धमकी...
न्यायासाठी धरणे देणाऱ्या जगेंद्र यांच्या कुटुंबीयाना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. पीडित कुटुंबाच्या तक्रारीवर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. डीआयजी आरकेएस राठोड यांनी स्वतः रविवारी जगेंद्र यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली.

मैत्रिणीने दिला स्वतः जाळून घेतल्याचा जबाब
याआधी जगेंद्र यांच्या मैत्रिणीनेही धक्कादायक जबाब दिला होता. जगेंद्र यांनी स्वतःच जाळून घेतले होते, असे या जबाबात म्हटले होते. तिच्या वकिलांनीही त्याला दुजोरा दिला.
बातम्या आणखी आहेत...