आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकार हत्या : वाँटेडसोबत तेजप्रतापचा फोटो कसा? सर्वोच्च न्यायालयाचा लालूपुत्राला सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पत्रकार राजदेव रंजन यांच्या हत्येप्रकरणातील आरोपीसोबत छायाचित्र कसे, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांना केला आहे. तेजप्रताप यादव बिहारच्या आरोग्य खात्याचे मंत्री आहेत. कोर्टाने त्यांना नोटीस पाठवली आहे.
गँगस्टर शहाबुद्दीनच्या दोन शार्पशूटरपैकी असलेल्या एका आरोपीसाेबत तेजप्रताप यादव यांचे छायाचित्र सोशल मीडियातून झळकल्यानंतर राज्यात वादंग निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने हा प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सीबीआयने आपला अहवाल १७ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयात दाखल करावा. याचिकाकर्ते तसेच सदर महिलेच्या कुटुंबाला पोलिसांनी सुरक्षा द्यावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. तत्पूर्वी दिवंगत रंजन यांची पत्नी आशा रंजन यांच्याकडून वकिलांनी कोर्टापुढे सीबीआयच्या कामकाजाबद्दल तक्रार नोंदवली. हत्येच्या प्रकरणात सीबीआयने तपासाचे काम अद्यापही सुरू केले नाही, असा दावा त्यांनी केला.
‘राजकीय दबावा’मुळे तसेच शहाबुद्दीनच्या भीती असल्याने तपासाला अद्याप सुरुवातही झालेली नाही. राज्याचे प्रशासन गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्याविरोधात ५८ फौजदारी खटले आहेत. २०१४ च्या बिहार सरकारच्या दस्तऐवजानुसार त्याच्यावर हे खटले आहेत. कोर्टाने शहाबुद्दीनसह अनेकांना नोटीस पाठवली आहे.
पुढे वाचा...
> छायाचित्राचा वाद काय ?
> तपास करू द्या
> भाजपच्या नेत्यांनाही नोटीस पाठवा : तेजप्रताप
बातम्या आणखी आहेत...