आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Journalist Reports Sitting On Uttarakhand Flood Victim\'s Shoulder, Sacked

पीडिताच्‍या खांद्यावर बसून रिर्पोटिंग करणा-या पत्रकाराने गमावली नोकरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- उत्तराखंड येथील पुराचे कव्‍हरेज करताना पीडिताच्‍या खांद्यावर बसून कॅमे-यासमोर बोलणा-या पत्रकाराला अखेर नोकरी गमवावी लागली आहे. तो ज्‍या वृत्तवाहिनीसाठी वार्तांकन करीत होता. त्‍यांनी त्‍याला नोकरीवरून काढून टाकले आहे.

वाहिनीच्‍या प्रमूखांनी ही माहिती दिली. बातमीसाठी एखाद्याच्‍या खांद्यावर अमानवी पद्धतीने बसणे चुकीचे होते, असे त्‍यांनी म्‍हटले. पत्रकार नारायण परगेन उत्तराखंड येथील पूर आणि भूस्‍खलनामुळे क्षतीग्रस्‍त झालेल्‍या भागाची बातमी कव्‍हर करण्‍यासाठी गेला होता. जेव्‍हा इंटरनेटवर हा व्हिडिओ अपलोड झाला तेव्‍हा हे प्रकरण सर्वांसमोर आले. यामध्‍ये नारायण एका स्‍थानिक व्‍यक्‍तीच्‍या खांद्यावर बसून रिर्पोटिंग करीत होता. ज्‍या व्‍यक्‍तीने पत्रकाराला खांद्यावर घेतले होते. त्‍याला त्‍याचा भार सहन होत नव्‍हता व तो थरथर कापत होता.