आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आरुषि'वर पुस्तक: लेखकाने उघड केले मर्डर मिस्ट्रीतील अनेक खळबळजनक खुलासे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशभर गाजलेल्या आरुषि हत्याकांड प्रकरणी 2013 साली कोर्टाने आरुषि आणि नोकर हेमराज यांच्या हत्येच्या गुन्हात आरुषिचे आई-वडील राजेश तलवार आणि नुपुर तलवार यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पत्रकार अविरुक सेन यांनी या मर्डर मिस्ट्रीवर 'आरुषि' हे पुस्तक लिहून अनेक खुलासे केले आहेत.
पुस्तकात दावा करण्यात आला, 'प्रत्येक सुनावणीवेळी सीबीआय जज श्यामलाल, तलवार यांचे वकील मीर यांना दोन गोष्टी आवर्जन सांगत. पहिली - लवकर संपवा आणि दुसरी - लिखित पुरावे सादर करा.' अॅड. मीर सांगतात, माझ्या आणि तलवार यांच्या प्रयत्नाचे काय फळ मिळेल याची पुसटशीही कल्पना नव्हती. पुस्तकात म्हटले आहे, की सीबीआय जज श्यामलाल यांचा टायपिस्ट मुलगा आशुतोष म्हणाला की, या प्रकरणाचा निर्णय आधीच ठरला होता. बचाव पक्षाची बाजू पुर्णपणे ऐकूनच घेण्यात आली नाही. सीबीआय तपासातही अनेक त्रुटी होत्या.
पुस्तकाचे लेखक सेन सांगतात, की आरुषि-हेमराज दुहेरी खून खटल्याचा निकाल तयार केला जात असताना सीबीआय जजने वकील मुलगा आशुतोष यालाच टायपिंगचे काम दिले होते. कारण इंग्रजी टायपिंग करण्याऱ्याची ते व्यवस्था करु शकले नव्हते. जेव्हा लेखकाने निवृत्त न्यायाधिश श्यामलाल यांना विचारले की, एक पेज टाइप करण्यासाठी किती वेळ लागतो, त्यांनी सांगितले दहा मिनीट. पुस्तकात म्हटल्या प्रमाणे तेव्हाच जज यांचा मुलगा आशुतोष चर्चेत सहभागी झाला. त्याने सांगितले, आरुषि प्रकरणाची बाब वेगळी होती. आम्हाला निकालात चांगल्या शब्दांचा वापर करायचा होता. त्याने सांगितले, टायपिस्टला शोधणे सोपे काम नव्हते. कारण गाझियाबादमध्ये बहुतेक सर्व हिंदी जाणणारेच टायपिस्ट होते, फार कमी लोक आहेत ज्यांना इंग्रजी टायपिंग जमते. त्यामुळे मी स्वतःच टायपिंग सुरु केले. पहिली दहा पानेतर करुनही टाकली. मात्र निकाल 210 पानांचा होता आणि त्यासाठी जवळपास एक महिना लागला.
सीबीआय जज श्यामलाल 25 नोव्हेंबर 2013 रोजी निर्णय देणार होते. तर, बचाव पक्षाचे वकील मीर यांनी शेवटचा युक्तीवाद 24 ऑक्टोबर रोजी सुरु केला होता. पुढील दोन आठवडे त्यांनी 24 परिस्थिती मांडल्या ज्यामुळे तलवार दांपत्याची निर्दोष मुक्तता होऊ शकत होती. मीर यांनी त्यांचा युक्तीवाद पूर्णही केला नव्हता तेव्हाच जज आणि त्यांचा मुलगा निकाल लिहिण्यात गर्क होते. तलवार आणि मीर यांना देखील टायपिस्टची समस्या जाणवत होती. त्यांना त्यांचे तर्क 10 नोव्हेंबर पर्यंत लिखित स्वरुपात सादर करायचे होते. (त्यांचा टायपिस्ट कबाबचा व्यापारी होता आणि त्याकाळात सणांचे दिवस असल्याने तो व्यस्त होता.) उल्लेखनिय बाब म्हणजे, 25 नोव्हेंबर 2013 रोजी जज श्यामलाल यांनी राजेश आणि नुपुर तलवार दोषी असल्याचा निकाल दिला.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, डॉ. तलवार यांच्या डायरीतली काही पाने...
बातम्या आणखी आहेत...