आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • JPS Virk Suspended In The Case Of INS Airavati Accident

आयएनएस ऐरावत दुर्घटना प्रकरणी जेपीएस विर्क बडतर्फ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयएनएस ऐरावत दुर्घटना प्रकरणात या जहाजाचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन जेपीएस विर्क यांना मंगळवारी बडतर्फ करण्यात आले. जहाजाला गेल्या आठवड्यात अपघात झाला होता.जहाज अपघातग्रस्त होण्याची कारणे शोधण्यासाठी बोर्ड ऑफ इन्क्वायरीची (बीओआय) स्थापना करण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल अद्याप आला नसल्याची माहिती नौदलाच्या अधिका-यांनी मंगळवारी दिली. संरक्षण मंत्रालयाने सोमवारी नौदलाच्या वरिष्ठ अधिका-यांना बोलावून कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली. यानंतर लढाऊ जहाज दुर्घटनाप्रकरणी कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे.
नौदलाचे अध्यक्ष अ‍ॅडमिरल डी.के. जोशी म्हणाले, भारतीय नौदलाच्या दुर्घटनांचा इतिहास फार चांगला नाही. दुसरीकडे, संरक्षणमंत्री ए.के. अँटनी यांनी लढाऊ जहाजे अपघातग्रस्त झाल्यामुळे देशाचा खर्च वाढतो, त्यामुळे ती वाचवायला हवीत, असे म्हटले आहे.
अन्य काही दुर्घटना
23 डिसेंबर रोजी रत्नागिरीजवळ आयएनएस तलवार मच्छीमारांच्या बोटीला धडकले होते. त्यानंतर कमांडर कॅप्टन गोपाल सुरी यांना हटवण्यात आले. आयएनएस बेतवाचे कॅप्टन दीपक बिष्ट यांना बडतर्फ करण्यात आले. मुंबई बंदरावर येत असताना त्या जहाजावरील उपकरणांचे नुकसान झाले होते. 14 ऑगस्ट रोजी आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडी स्फोटानंतर बुडाली.